सध्या द हंड्रेड स्पर्धेचा पहिला हंगाम सुरू झाला आहे. या स्पर्धेमध्ये अनेक देशातील खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेमध्ये भारतीय महिला खेळाडूंनी देखील सहभाग घेतला आहे. याच स्पर्धेचा मंगळवारी (२७ जुलै) आणखी एक सामना खेळण्यात आला होता. या स्पर्धेत भारतीय महिला फलंदाज स्मृती मंधनाने पुन्हा एकदा आपली आक्रमक खेळी दाखवली आहे. हा सामना मंगळवारी कार्डिफ के सोफिया गार्डन येथे खेळण्यात आला होता. या सामन्यात स्मृतीने ३९ चेंडूमध्ये ६१ धावा काढल्या.
या आक्रमक खेळीसह स्मृतीने या सामन्याचा शेवट षटकार मारून केला आहे. आपल्या खेळीत स्मृतीने ५ चौकार आणि ३ षटकार मारले आहेत. स्मृती साउथर्न ब्रेव वूमेन संघाकडून प्रतिनिधित्त्व करत आहे. स्मृतीने ही आक्रमक खेळी वेल्श फायर वूमेन संघाच्या विरुद्ध खेळली आहे.
वेल्श फायर संघाने प्रथम फलंदाजी करत १०० चेंडूंमध्ये ७ खेळाडू गडी गमावत ११० धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करत स्मृती मंधना आणि डेनियल वॅट सलामीला मैदानात उतरल्या होत्या. परंतु डेनियल वॅट लवकर बाद झाली आणि त्यानंतर सोफिया डंकलेने 16 चेंडूत 16 धावा केल्या. एकीकडे स्मृती टिकून राहिली तर दुसऱ्या बाजूला एकही फलंदाज धावा काढण्यात प्रभावी ठरला नाही. स्मृतीने एक बाजू टिकवून ठेवत वेगाने धावा केल्या. त्यामुळे ब्रेव वूमेन संघाने ८४ चेंडूत हा सामना संपवला. स्मृतीने १५६ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. साउथर्न ब्रेव वूमेन्स हा सामना ८ विकेट्सने जिंकला.
भारतीय महिला संघ जून महिन्यात पुरुष संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. इंग्लंड संघाविरुद्धच्या कसोटी सामन्याव्यतिरिक्त एकदिवसीय आणि टी २० मालिका खेळल्यानंतर आता भारतीय महिला द हंड्रेड स्पर्धा खेळत आहेत.
द हंड्रेड ही स्पर्धा इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने आयोजित केली आहे. या स्पर्धेत खेळल्या जाणाऱ्या एका सामन्याचा प्रत्येक डाव १०० चेंडूचा असतो. त्याचबरोबर या सामन्यात १ षटक ५ चेंडूंचा असतो.
महत्त्वाच्या बातम्या –
पुण्याचा ऋतुराज गायकवाड दुसऱ्या टी२० सामन्यातून पदार्पण करण्याची शक्यता, ‘हे’ आहे मोठे कारण
भारताच्या आशांवर पाणी! ऑलिंपिक पदकाच्या शर्यतीतून भारतीय नौकानयन जोडी बाहेर
काय सांगता! दिग्गज गॅरी सोबर्स यांनी चक्क दारुच्या नशेत लॉर्ड्सवर झळकावले होते शतक, वाचा तो किस्सा