---Advertisement---

फलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून आहे भारताचे यश- सौरव गांगुली

On: रविवार, जुलै 22, 2018 7:12 AM
---Advertisement---

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी मोठे वक्तव्य केले आहे.

भारताचे इंग्लंडमधील कसोटी मालिकेतील यश फलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून असेल असे गांगुली म्हणाला.

“कसोटी क्रिकेटमध्ये विरोधी संघाला आव्हन देण्यासाठी एका डावात ४०० धावा करने गरजेचे असते. पहिल्या डावात जो संघ ४०० धावा करतो तो संघ सामना जिंकू शकतो. भारतीय संघ प्रतिभावान आहे. जर चांगली फलंदाजी केली तर भारताचे यश नक्की आहे.” असे माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाला.

सौरव गांगुलीने पुढे माजी कर्णधार एमएस धोनीच्या फॉर्मविषयी सुद्धा आपले मत व्यक्त केले.

“सध्या धोनी फॉर्ममध्ये नसला तरी, मला आशा आहे की येत्या काळात धोनी जोरदार पुनरागमन करेल. त्याच्याकडे आणखी काही काळ चांगली फलंदाजी करण्याची क्षमता आहे.” असे गांगुली म्हणाला.

भारत- इंग्लंड यांच्यात 1 ऑगस्टपासून पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरु होत आहे.

या कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघ जोरदार तयारीला लागले आहेत. भारतीय संघाने या इंग्लंड दौऱ्यात टी-20 मालिका 2-1 ने जिंकली होती, तर एकदिवसीय मालिकेत इंग्लंडने भारतावर 2-1 ने विजय मिळवला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

-एमएस धोनी बाबतची बीसीसीयने सुधारली ही मोठी चूक

-कुलदीपच्या कसोटी संघातील समावेशाने मुंबईकर माजी फलंदाज नारज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment