---Advertisement---

भुवनेश्वर कुमारने जिंकले 140 कोटी भारतीयांचे मन, मुलांच्या शिक्षणासाठी ‘एवढे’ लाख रुपये केले दान!

On: शनिवार, जुलै 1, 2023 7:07 PM
Bhuvneshwar-Kumar
---Advertisement---

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार मागील दीर्घ काळापासून संघातून बाहेर आहे. असे असले, तरीही तो नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल 2023 हंगामात खेळताना दिसला होता. या हंगामात तो सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग होता. सध्या भुवनेश्वर वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. खरं तर, या भुवनेश्वर कुमारने गुरुकूल आश्रमात 10 लाख रुपये दान केले आहेत. मात्र, याची अधिकृत पुष्टी अद्याप झाली नाहीये, पण माध्यमांतील वृत्तांमध्ये असा दावा केला जात आहे.

भुवनेश्वर कुमारने 10 लाख रुपये केले दान
माध्यमांतील वृत्तांनुसार, भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याने गुरुकूल आश्रम (Gurukul Aashram) येथे 10 लाख रुपये दान (Bhuvneshwar Kumar Donate 10 Lakh Rupees) केले आहेत. खरं तर, त्याने मुलांच्या शिक्षणासाठी हे पैसे दिले आहेत. असे असले, तरीही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाहीये. माध्यमांमध्ये असा दावा केला जातोय की, भुवनेश्वरने मुलांच्या शिक्षणासाठी गुरुकूल आश्रमाला एवढी मोठी रक्कम दिली आहे.

भुवनेश्वरची कारकीर्द
भुवनेश्वर कुमार याच्याविषयी बोलायचं झालं, तर तो सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. तो शेवटचा आयपीएल 2023 हंगामात खेळताना दिसला होता. त्याने आयपीएल हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना 14 सामन्यात 16 विकेट्स घेतल्या होत्या. यादरम्यान भुवनेश्वरने 26.56च्या सरासरीने गोलंदाजी केली. त्याने हैदराबादव्यतिरिक्त आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पुणे वॉरिअर्स संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे. तसेच, त्याने एकूण 160 आयपीएल सामने खेळताना 170 विकेट्सही घेतल्या आहेत.

दुसरीकडे, त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत 21 कसोटी सामने खेळले आहेत. तसेच, 121 वनडे आणि 87 आंतरराष्ट्रीय टी20 सामनेही खेळले आहेत. कसोटीत त्याने 63 विकेट्स, वनडेत 141 विकेट्स आणि टी20त 90 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने भारताकडून शेवटचा सामना 22 नोव्हेंबर, 2022 रोजी न्यूझीलंडविरुद्ध मॅकलीन पार्क येथे खेळला होता. (indian bowler bhuvneshwar kumar donated to gurukul aashram read here)

महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! आयर्लंड दौऱ्यासाठी संघाची घोषणा, पाहा कुणाला मिळालीय संधी
“अश्विन एकदा तरी भारताचा कर्णधार व्हावा”, सहकाऱ्यानेच व्यक्त केली इच्छा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---