भारताचा पुरूष क्रिकेट संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. ज्यामध्ये वनडे मालिकेनंतर कसोटी मालिकेला सुरूवात झाली आहे. दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना 14 डिसेंबरपासून चट्टोग्राम येथे खेळला जात आहे. भारताने नाणफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना सर्व विकेट्स गमावत 404 धावसंख्या उभारली. यजमानांचा संघ जेव्हा फलंदाजीस उतरला तेव्हा भारताच्या कुलदीप यादव-मोहम्मद सिराज यांच्या गोलंदाजीपुढे त्यांचे काही चालले नाही आणि पहिल्या डावात त्यांनी केवळ 150 धावा केल्या. यामध्ये कुलदीपने 5 विकेट्स घेतल्या आणि अनेक विक्रमे आपल्या नावावर केली.
डाव्या हाताचा फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याने 2017मध्ये भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्याने आतापर्यंत तीन वेळा कसोटीच्या एका डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. त्याचबरोबर तो बांगलादेशविरुद्ध कसोटीच्या एका डावात 5 विकेट्स घेणारा सातवा भारतीय ठरला आहे. त्याच्याआधी अशी कामगिरी इरफान पठाण, झहीर खान, आर अश्विन, सुनिल जोशी, इशांत शर्मा आणि उमेश यादव यांनी केली आहे.
पठाणने सर्वाधिक असे तीन वेळा बांगलादेशविरुद्ध 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. त्यानंतर झहीरचा क्रमांक लागतो. त्याने दोन वेळा अशी कामगिरी केली आहे. बांगलादेशविरुद्ध कसोटीमध्ये अश्विन, जोशी, इशांत, उमेश आणि आता कुलदीप यांनी प्रत्येकी एक-एक वेळा अशी कामगिरी केली आहे.
या सामन्यातील बांगलादेशच्या पहिल्या डावात कुलदीपने 16 षटके टाकताना 2.50च्या इकॉनॉमी रेटने 40 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. जी त्याची कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी ठरली.
A stunning all round display from the left arm spinner as @imkuldeep18 registers his third 5-wicket haul in Test cricket.
Live – https://t.co/GUHODOYOh9 #BANvIND pic.twitter.com/gYdjRI4ISG
— BCCI (@BCCI) December 16, 2022
तत्पूर्वी भारताच्या पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा (90), श्रेयस अय्यर (86) आणि आर अश्विन (58) यांनी अर्धशतकी खेळी केल्या. प्रत्युत्तरात जेव्हा बांगलादेशचा संघ फलंदाजीस उतरला तेव्हा संघाने पहिल्याच चेंडूवर विकेट गमावली आणि विकेट्स पडण्याचे प्रकरण पुढे सुरूच राहिले. ज्यामुळे संघाचा पहिलाच डाव 55.5 षटकात 150 धावसंख्येवर संपुष्टात आला. यामुळे भारताला 254 धावांची भक्कम आघाडी मिळाली आहे. Indian Bowlers to take five-fer against Bangladesh in Tests, Kuldeep Yadav & Chattogram Test
बांगलादेशविरुद्ध कसोटीच्या एका डावात 5 किंवा 5+ विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज-
3 – इरफान पठाण
2 – झहीर खान
1 – रविचंद्रन अश्विन
1 -सुनील जोशी
1 – इशांत शर्मा
1 – उमेश यादव
1 – कुलदीप यादव
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BANvIND: कुलदीपच्या ‘पंच’ने बांगलादेशी फलंदाज गडबडले, यजमानांचा पहिला डाव 150वरच आटोपला
मुंबई सिटी एफसी पुन्हा नंबर वन बनण्यासाठी प्रयत्नशील, ईस्ट बंगाल एफसीचा करणार सामना