जपानची राजधानी टोकियो येथे सध्या टोकियो ऑलिंपिक २०२० चा थरार रंगला आहे. ऑलिंपिक्सच्या दुसऱ्याच दिवशी वेट लिफ्टर मिराबाई चानू हिने भारताला पहिले पदक (रौप्य पदक) जिंकून दिले होते. यानंतर आता अजून एक पदक भारताच्या झोळीत पडण्याच्या अपेक्षा आहेत. भारताची बॉक्सर लवलीना बोरगोहेन हिने टोकियो ऑलिंपिकची जोरदार सुरुवात केली असून क्वार्टर फाइनलचे तिकीट मिळवले आहे. अर्थात ती पदक पटकावण्यापासून फक्त १ पाऊल दूर आहे.
लवलीना बोरगोहेनने राउंड ऑफ १६ मध्ये ६९ किलो वजनी गटात आपल्यापेक्षा जास्त अनुभवी असलेल्या जर्मनीच्या एपेट्स नेदिनला पराभूत केले आहे. लवलीनाने हा सामना ३-२ ने जिंकला आहे. यासह तिने टोकियो ऑलिंपिकच्या टॉप-८ बॉक्सरच्या पंक्तीत जागा मिळवली आहे.
Onwards! 🥊🔥
Power packed punching from Lovlina Borgohain lands her a last eight slot as she wins 3-2 against Nadine Apetz of #GER in the women's 69kg welterweight category! 👏 #IND #Tokyo2020 | #StrongerTogether | #UnitedByEmotion | @LovlinaBorgohai pic.twitter.com/Y9rserNmyR
— Olympic Khel (@OlympicKhel) July 27, 2021
कोण आहे लवलीना बोरगोहेन?
लवलीना ही केवळ २४ वर्षांची आहे. आसामच्या एका छोट्याशा गावातून आलेल्या लवलीनाने ऑलिंपिकपर्यंतचा प्रवास केला आहे. ती आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील सरुपथर विधानसभेच्या बरोमुखिया या छोटाशा गावातील राहणारी आहे. यापुर्वी तिने २ वेळा विश्व चँपियनशीपमध्ये पदक जिंकले आहे. असा पराक्रम करणारी ती आसामची पहिली बॉक्सर आहे.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
सुवर्ण पदकाची दावेदार मानली जाणारी नाओमी ओसाका सरळ सेटमध्ये पराभूत, वोंड्रासोव्हाने दिली मात