टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये शनिवारी (३१ जुलै) भारतासाठी संमिश्र सुरुवात झाली आहे. तिरंदाजीत अतनू दास पराभूत झाला. त्यानंतर डिस्कस थ्रोमध्ये कमलप्रीत कौरने इतिहास रचत अंतिम फेरीत स्थान मिळवले. सोबतच हॉकीत भारतीय महिला संघाने विजय मिळवला. अशातच आता वाईट बातमी समोर येत आहे. महिला बॉक्सिंगमध्ये ७५ किलो वजनी गटातील उपांत्यपूर्व सामना भारताच्या पूजा राणी आणि जागतिक अव्वल क्रमांकाच्या चीनच्या ली क्वियानमध्ये झाला. यात भारताच्या पूजा राणीला ०-५ ने एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला आहे. यासोबतच तिचा ऑलिंपिक्स २०२० चा प्रवास इथेच संपला असून ती बाहेर पडली आहे.
या सामन्यात पहिल्या राऊंडमध्ये चीनच्या लीवर पूजाने आघाडी घेतली होती. मात्र, तरीही चीनच्या लीने आक्रमक खेळी केली. यावेळी पूजाने बचाव आणि आक्रमक रणनीती वापरली. तरीही परीक्षकांनी या राऊंडमध्ये चीनच्या बॉक्सिंगपटूला ५-० असे गुण दिले. (Indian boxer Pooja Rani loses to Li Qian of China 0-5 in women’s middleweight (69-75kg) quarter-finals)
#TeamIndia | #Tokyo2020 | #Boxing
Women's Middle Weight 69-75kg Quarterfinals Results@BoxerPooja bows out of medal contention race as she put up a valiant fight against Qian Li. Brave effort champ 🙌 We'll be back #StrongerTogether #RukengeNahi #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/rDWMFnoXqm— Team India (@WeAreTeamIndia) July 31, 2021
त्यानंतर दुसऱ्या राऊंडमध्येही पूजाला लीने ५-० ने पराभूत केले. यावेळी पूजा लीसमोर कमकुवत दिसली. या सामन्यात ली पूर्णपणे पूजावर वर्चव्स गाजवत होती. तिसऱ्या राऊंडमध्येही लीने पूजाला पराभूत केले. त्यामुळे तिला या सामन्यात ५-० ने पराभवाचा सामना करावा लागला.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-दोन वेळची पदक विजेती सीमा पुनियाने केला ६०.५७ मीटरचा डिस्कस थ्रो; मिळवला ‘हा’ क्रमांक
-लंडन ऑलिंपिक मेडलिस्टकडून अतनू दास पराभूत; तिरंदाजीतील भारताचे आव्हान संपुष्टात