सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. याद्वारे भारतीय संघाने जूनमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेच्या अभियानाची तयारी सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, या मालिकेतून भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आहे. त्यात रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. सध्या रोहित आणि विराटच्या टी20 कारकीर्दीविषयी चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.
टी20 विश्वचषक 2022च्या उपांत्य सामन्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली (Rohit Sharma And Virat Kohli) या प्रकारात खेळलेच नाहीयेत. रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्याने 2023मध्ये टी20 सामन्यात संघाचे नेतृत्व केले आहे. अशात रोहित-विराटविषयी पाकिस्तान संघाचे माजी कर्णधार वसीम अक्रम (Wasim Akram) यांचे मोठे विधान चर्चेत आहे.
पाकिस्तानचे माजी कर्णधार वसीम अक्रम यांना विश्वास आहे की, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) यांनी आगामी टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2204) स्पर्धेत खेळले पाहिजे.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडे अनुभव
स्पोर्ट्सकीडा या क्रिकेट वेबसाईटसोबत बोलताना वसीम अक्रम म्हणाले, “टी20 विश्वचषक आता काहीच महिने दूर आहे. मी दोन्ही फलंदाजांना निवडेल. ते दोन्ही खेळाडू भारतासाठी मुख्य खेळाडू असतील, यात कोणतीही शंका नाहीये. टी20त तुमच्याकडे थोड्या अनुभवाची गरज असते. तुम्ही फक्त युवा खेळाडूंवर विश्वास ठेवू शकत नाहीत.”
रोहित आणि विराटची टी20 कारकीर्द
खरं तर, रोहित शर्मा याने भारतीय संघाकडून एकूण 148 टी20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 31.32च्या सरासरीने 3853 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याच्या बॅटमधून 4 शतके आणि 29 अर्धशतकेही निघाली आहेत. याव्यतिरिक्त विराट कोहलीने भारताकडून 115 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 52.73च्या सरासरीने 4008 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 37 अर्धशतकांचा समावेश आहे. (indian captain rohit sharma and virat kohli should play 2024 t20 world cup pakistani former captain wasim akram)
हेही वाचा-
सूर्यासोबत काय चर्चा करून इशानने ऑस्ट्रेलियन स्पिनरला दिला चोप? स्वत:च केला खुलासा; म्हणाला, ‘मला जोखिम…’
टीम इंडियातून बाहेर असलेल्या संजू सॅमसनचे धक्कादायक विधान; म्हणाला, ‘लोक मला सर्वात दुर्दैवी क्रिकेटर…’