वनडे विश्वचषक 2023 मध्ये रविवारी (29 ऑक्टोबर) भारत आणि इंग्लंड समोरासमोर आले. लखनऊ येथील इकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला अजिबात डोके वर काढू दिले नाही. भारतीय गोलंदाजांनी केवळ 230 धावांचा बचाव करताना तब्बल 100 धावांनी विजय मिळवून दिला. या विजयासह भारताचे उपांत्य फेरीतील स्थान पक्के झाले. या सलग सहाव्या विजयानंतर बोलताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली.
भारतीय संघाचा हा विश्वचषकातील सलग सहावा विजय ठरला. या विजयानंतर बोलताना कर्णधार रोहित म्हणाला,
“हा असा सामना होता ज्यामध्ये अनेक खेळाडूंनी आपले योगदान दिले. आमची फलंदाजी संपली तेव्हा वाटत होते की आपण 30 धावा कमी केल्या आहेत. त्यामुळे सुरुवातीला दोन बळी मिळवणे आवश्यक होते. आम्ही नेहमीच आमच्या अनुभवी गोलंदाजांवर अवलंबून राहिलो आहे आणि त्यांनी अपेक्षा पूर्ण केल्या. आमच्याकडे गोलंदाजांची सर्वोत्तम फळी आहे.”
या सामन्याचा विचार केल्यास भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्माच्या 87 व सूर्यकुमार यादवच्या 49 धावांच्या जोरावर 229 अशी मामुली धावसंख्या उभी केली होती. या धावांचा बचाव करताना शमी व बुमराह यांनी पहिल्या दहा षटकातच इंग्लंडच्या चार गड्यांना तंबूचा रस्ता दाखवून विजयाचा मार्ग खुला केला. त्यांना कुलदीप व जडेजा यांनी योग्य साथ दिली. यासह भारताने 100 धावांनी विजय साजरा केला.
(Indian Captain Rohit Sharma Speaks After Defeat England In ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या –
‘आमच्याही संघात जर स्कॉट एडवर्ड्ससारखा…’, नेदरलँड्सच्या विजय पाहून मोठी गोष्ट बोलला विंडीजचा दिग्गज
“रोहित स्वतःसाठी खेळला असता तर…”, गंभीरच्या त्या विधानाने उंचावल्या भुवया