निर्णायक सामन्यात कर्णधार विराट कोहलीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पाचव्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर आठ गडी राखून मात केली. त्याचबरोबर भारतीय संघाने पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका ३-१ अशी जिंकली.
या सामन्यात विजयी शतकी खेळी करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीने काल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक खास विक्रम मोडला. सचिनने आपल्या कारकिर्दीतील ४९ शतकी खेळीत तब्बल १७ खेळी ह्या धावांचा पाठलाग करताना केल्या आहेत. तो एक विश्वविक्रम होता. परंतु भारतीय कर्णधार विराट कोहलीने हा विश्वविक्रम मोडत धावांचा पाठलाग करताना तब्बल १८ शतकी खेळी केल्या आहेत.
विशेष म्हणजे विराटने ही कामगिरी केवळ १८९ सामन्यात केली आहे. धावांचा पाठलाग करताना विराटची सरासरी ही १०२ डावात तब्बल ६६.१५ अशी आहे. धावांचा पाठलाग करताना सचिनने जी १७ शतके केली त्यासाठी सचिनला २३२ इंनिंग लागल्या तर विराटने फक्त १०२ इंनिंगमध्ये १८ शतके केली आहे.
धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक शतके करणारे खेळाडू
१८ विराट कोहली, डाव- १८९
१७ सचिन तेंडुलकर, डाव- २३२
११ तिलकरत्ने दिलशान डाव- ११६
११ ख्रिस गेल, डाव- १३९