भारत आणि पाकिस्तान संघ टी-२० विश्वचषकातील त्यांच्या अभियानाची सुरुवात एकमेकांविरुद्धच्या सामन्याने करणार आहेत. रविवारी (२४ ऑक्टोबर) या दोन संघामधील संघर्ष चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. या सामन्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने माध्यमांसोबत चर्चा केली आहे.
पाकिस्तान संघ खूप मजबूत आहे आणि नेहमीच राहिला आहे, असे विराटने यावेळी सांगितले आहे. त्याच्या मते चांगल्या क्रिकेटच्या प्रदर्शनामुळे भारताने आतापर्यंत विजय मिळवला आहे.
यावेळी विराटला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण कोण असेल याबाबत प्रश्न विचारण्यात आला. याबाबत बोलताना विराट म्हणाला की, “हे पाहा, आमच्या संघात खूप चांगले संतुलन आहे. आम्हाला हे चांगल्या प्रकारे माहीत आहे की, मैदानावर पाकिस्तानविरुद्ध कोणते अकरा खेळाडू घेऊन उतरायचे आहे. पण या गोष्टीचा खुलासा आम्ही आता करू शकत नाही.”
पाकिस्तानविरुद्ध मागच्या टी-२० विश्वचषकात केलेल्या प्रदर्शनाविषयी विराटला प्रश्न विचारला गेला. त्यावर उत्तर देताना विराट म्हणाला की, “आम्ही याआधी काय केले आहे, याविषयी कधीच चर्चा करत नाही. जसे की मी सांगितले, या सगळ्या गोष्टींमुळे तुमचे लक्ष विचलित होते. सर्वात जास्त महत्वाचे हे आहे की, तुम्ही तयारी कशाप्रकारे करता आणि त्यादिवशी तुम्ही कशाप्रकारे क्रिकेट खेळता. मागच्या सामन्यात आम्ही चांगले क्रिकेट खेळले, त्यामुळे जिंकू शकलो.”
???? ???? We are confident in terms of execution of our plans.
Captain @imVkohli on #TeamIndia's approach ahead of the #T20WorldCup opener against Pakistan. #INDvPAK pic.twitter.com/BiMug1gfUh
— BCCI (@BCCI) October 23, 2021
पाकिस्तानविरुद्ध चांगला खेळ दाखवला, त्यामुळे जिंकलो, पण हा संघ नेहमीच मजबूत राहिला आहे, असेही मत विराटने व्यक्त केले आहे.
तो म्हणाला की, “पाकिस्तानचा संघ माझ्या हिशोबाने खूप मजबूत संघ आहे आणि नेहमीच मजबूत संघ राहिला आहे. त्यांच्या विरोधात तुम्हाला नेहमीच तुमचे सर्वक्षेष्ठ क्रिकेट खेळावे लागेल, कारण त्यांच्याकडे खूप टॅलेंट आहे आणि असे खेळाडू आहेत, जे सामन्याचे दिशा बदलू शकतात. अशा संघाविरुद्ध तुम्हाला तुमची सर्वोत्तम योजना घेऊन समोर यावे लागते. ही गोष्ट निश्चित करायची असते की, तुम्ही त्याला योग्यप्रकारे अंमलात आणू शकाल.”
महत्त्वाच्या बातम्या –
तब्बल तीन वर्षांपासून फुस्स ठरतोय फिंच; नावावर झाली ही लाजीरवाणी आकडेवारी
“हार्दिकने गोलंदाजी केली नाही, तरी तो मॅन विनर”, विराटचे टीकाकारांना प्रत्युत्तर
‘भारत विजेतेपदाचा दावेदार असला, तरी प्रबळ दावेदार नाही’, माजी इंग्लिश कर्णधाराचे वक्तव्य






