हॅमिल्टन | भारत विरुद्ध न्यूझीलंड चौथा वनडे सामना ३१ जानेवारीपासून हॅमिल्टन येथे सुरु होत आहे. भारतीय संघ मालिकेत ३-० असा विजयी आघाडीवर आहे.
चौथा कसोटी सामना हा भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माचा २००वा वनडे सामना ठरणार आहे. यापुर्वी रोहितने १९९ वनडे सामने खेळले असून त्यात ४८.१४च्या सरासरीने ७७९९ धावा केल्या आहेत.
२००वनडे सामने खेळणारा रोहित जगातील ८०वा खेळाडू ठरणार आहे.
विशेष म्हणजे भारतीय महिला संघ देखील न्यूझीलंडमध्ये वनडे मालिकेत २-० असा विजयी आघाडीवर आहे. तसेच भारतीय संघाची कर्णधार मिताली राज आपला २००वा वनडे सामना १ फेब्रुवारी रोजी हॅटिल्टन येथेच न्यूझीलंड संघाविरुद्ध खेळणार आहे.
तीने आजपर्यंत १९९वनडे सामन्यांत ५१.६६च्या सरासरीने ६६१३ धावा केल्या आहेत. महिला वनडे क्रिकेटमध्ये २०० सामने खेळणारी ती पहिली खेळाडू ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–टीम इंडियाकडून अजून एकही सामना न खेळलेल्या खेळाडूचे विराट कोहलीने केले कौतुक
–टीम इंडियाकडून यशस्वी पुनरागमन केल्यानंतर हार्दिक पंड्याने मानले आभार
–९ वर्षानंतर रोहित शर्माच्या बाबतीत घडली ही नकोशी गोष्ट