जकार्तामध्ये झालेल्या एशियन गेम्समधील सुवर्णपदक विजेत्या कुस्तीपटू विनेश फोगटच्या मते भारतीय प्रशिक्षक हे ऑलिंपिकचे पदक मिळवून देण्यात असक्षम आहेत.
“भारतीय प्रशिक्षक चांगले निकाल देत आहेत. पण ऑलिंपिक सारख्या स्पर्धेत ते पदके मिळवून देऊ शकत . ही स्पर्धा खुप कठीण असते. जर आम्हाला विदेशी प्रशिक्षक मिळाले तर ते प्रत्येक दिवसाचे वेळापत्रक ठरवून योग्य अश्या सुचना सांगतील”, असे विनेश स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने पदक विजेत्यांच्या सन्मांनासाठी ठेवलेल्या कार्यक्रमात बोलत होती.
2014 आणि 2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या विनेशने जकार्ताच्या 50 किलो गटात सुवर्णपदक जिंकले आहे. तसेच तिने 2020च्या टोकियो ऑलिंपिकसाठी खाजगी प्रशिक्षक ठेवणार असल्याचेही सांगितले आहे.
“हंगेरियाच्या वॉलर अको यांनी मला एशियन गेम्स सुरू होण्याआधी काही महत्त्वाच्या सुचना दिल्या होत्या. त्या सुचनांचा मला जकार्तामध्ये खुप फायदा झाला. यामुळेच मला वाटते जर ऑलिंपिक पदक जिंकायचे असेल तर विदेशी प्रशिक्षक असणे जरूरी आहे.”
“एशियन गेम्स सुरू हेण्याआधी मी हंगेरीला गेले होते. यामुळेच मी स्पॅनिश ग्रॅंड पिक्समध्ये सुवर्ण पदक जिंकू शकले. अशाच प्रकारचा सराव मला पुढील दोन वर्षे मिळाला तर मी नक्कीच ऑलिंपिकमध्ये पदक जिंकेल.” असेही ती पुढे म्हणाली.
विनेश बरोबर या कार्यक्रमात एशियन गेम्सची कांस्यपदक विजेती दिव्या काकरान आणि 2010राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेती गीता फोगटही होती.
बुडापेस्टमध्ये होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये विनेश पहिल्यांदाच सहभागी होणार आहे. ही स्पर्धा 20 ते 28 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–हॉकीपटू सरदार सिंगने घेतली आतंरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्ती
–पराभवानंतरही टीम इंडिया अव्वल स्थानी कायम