1 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी बुधवारी (18 जुलै) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
भारतीय संघासाठी समाधानकारक बाब अशी की दुखापतीमुळे इंग्लंड विरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेला मुकलेला जसप्रीत बुमराहचा संघात समावेश करण्यात आला आहे. बुमराह दुसऱ्या सामन्यापासून भारतीय संघात दाखल होईल.
TEAM NEWS: #TeamIndia for the first three Tests against England announced #ENGvIND. Bhuvneshwar Kumar aggravated a lower back condition in the 3rd ODI. His condition is being assessed & a call on his inclusion in the Test squad will be made soon. pic.twitter.com/lhlF65VRUP
— BCCI (@BCCI) July 18, 2018
या 18 सदस्सीय संघात नवख्या ऋषभ पंतचा समावेश करण्यात आला आहे. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या करुण नायरचे भारतीय संघात पुनरागमन केले आहे. तर रोहित शर्माला पुन्हा एकदा संघातून डच्चू देण्यात आला आहे.
त्याचबरोबर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या शार्दुल ठाकूरलाही कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून वैयक्तीक कारणांमुळे त्रस्त असलेल्या मोहम्मद शमीलाही या संघात स्थान मिळाले आहे. जूनमध्ये योयो टेस्टमध्ये फेल झाल्यामुळे अफगानिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यात शमीला मुकावे लागले होते. त्यानंतर शमीने योयो टेस्ट पास करुन इंग्लड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी उपलब्ध झाला होता.
यामध्ये पाठीच्या दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या निवडीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. भुवनेश्वरच्या फिटनेसचा आढावा घेउन त्याच्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.
असा असेल पहिल्या तीन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ-
विराट कोहली(कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे(उप कर्णधार), करुण नायर, दिनेश कार्तिक(यष्टीरक्षक), ऋषभ पंत(यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर.
महत्त्वाच्या बातम्या-
-विरेंद्र सेहवागने दिला टीम इंडियाला आधार, ट्विट करुन जिंकली करोडो चाहत्यांची मने
-तब्बल नऊ एकदिवसीय मालिकेनंतर भारतीय संघावर आली ही वेळ