आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला एक महिना बाकी असताना भारतीय संघाने संघ जाहिर केला आहे. 5 ऑक्टोंबरपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी अनेक देशांनी आपला संघ जाहिर केला आहे. यात आता भारतीय संघाने देखिल आपला संघ जाहिर केला आहे. यात भारतीय संघाचे अनेक दिग्गज खेळाडूंना संघातून वगळण्यात आलेले दिसून आले.
भारतीय निवड समितीने 15 संदस्यीय खेळाडूंचा संघ घोषत करताना भारताचे काही दिग्गज खेळाडूंना वगळण्यात आले. यात भारतीय संघाचा दिग्गज सलामविर शिखर धवन (Shikhar Dhawan), गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvaneshwar Kumar), संजू सॅमसन (Sanju Samson) आणि फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांचा समावेश आहे. भारतीय संघाचे हे एकेकाळी प्रमुख खेळाडू होते. परंतू आता संघाने यांना नजरअंदाज केले आहे.
या चार खेळाडूंची वनडे कारकीर्द
शिखरच्या वनडे कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 167 सामन्यात 6793 धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाज चहलने 71 वनजडे सामने खेळत 121 विकेट घेतल्या आहेत. सोबतच भारतीय संघाचा एका काळचा स्टार वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने भारतीय संघासाठी 121 वनडे सामन्यात 141 विकेट घेतल्या आहेत. तसेच संजू सॅमसनचीही यासाठी निवड झालेली नाही. त्याने संधी मिळूनही संघाला चांगली कामगिरी करून दाखवली नाही यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले आहे. असे म्हणले जात आहे.
वनडे विश्वचषक 2023साठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, शुबमन गिल, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल (indian cricket team announce for world cup 2023)
महत्वाच्या बातम्या-
जडेजा अन् अक्षरला निवडण्याविषयी अजित आगरकर स्पष्टच बोलला; म्हणाला, ‘आम्ही चर्चा केली, पण…’
विश्वचषकात संधी न मिळालेल्या खेळाडूंसाठी रोहितचा भावूक मेसेज; म्हणाला, ‘मी देखील…’