भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्या जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू मानला जातो. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये तो सातत्याने अप्रतिम कामगिरी करतोय. क्रिकेट विश्वातील अनेक मोठमोठे विक्रम त्याने आपल्या नावे केले आहेत. सध्या विराट आयपीएल २०२१ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे नेतृत्व करत आहे. त्याचवेळी विराटचे एक जुने छायाचित्र सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
विराटचे हे छायाचित्र होतेय व्हायरल
विराट नेतृत्व करत असलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ पहिल्या तीन सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत अव्वलस्थानी विराजमान आहे. त्याचवेळी सोशल मीडियावर विराटचे इयत्ता दहावीतील एक छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. या छायाचित्रात विराट आपल्या शाळेतील क्रिकेट संघासह दिसत आहे. विराट दहावीमध्ये असताना आपल्या शाळेच्या १५ वर्षाखालील संघाचा कर्णधार होता. क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यात यावे यासाठी विराटने पश्चिम बिहार येथील सेवियर कॉन्व्हेंट स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता.
आणखी एका छायाचित्रात विराटला शाळेच्या संघाचा कर्णधार केला आहे, ही माहिती पालकांना देण्यासाठी पाठवलेल्या नोटीसचे देखील छायाचित्र प्रसिद्ध होतेय. ही दोन्ही छायाचित्रे २००३ सालची आहेत.
शालेय क्रिकेटपासून झाली होती सुरुवात
शालेय क्रिकेटमधील दमदार कामगिरीच्या जोरावर २००२-२००३ मध्ये पॉली उम्रीगर करंडकसाठी त्याची दिल्लीच्या संघात निवड झाली होती. वेगाने यशाची शिखरे पादाक्रांत करत तो २००८ मध्ये भारताच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघाचा कर्णधार बनला व त्याच वर्षी मलेशियात झालेला विश्वचषक भारताने आपल्या नावे केला. विराटने २००८ मध्येच भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केले होते.
https://twitter.com/anushkaalol/status/1384422155689943040?s=20
यापूर्वी देखील झाली होती लहानपणीची छायाचित्रे व्हायरल
विराट कोहलीची लहानपणीची यापूर्वीदेखील काही छायाचित्रे व्हायरल झाली होती. भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याच्या हस्ते बक्षीस स्वीकारतानाचे छायाचित्र चाहत्यांच्या मनात बसलेले आहे. तसेच, शालेय क्रिकेटमधील उत्तम कामगिरीनंतर वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांची कात्रणे ही व्हायरल झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
अखेर पुणेकर जाधवला SRHच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली संधी; अशी राहिली आहे आयपीएल कारकिर्द
आम्ही त्याला तयार करत आहोत, तो नक्कीच भविष्यात चमत्कार करेल- रिषभ पंत
सेहवागने पाहिजे ते माग म्हटले असता मिश्रा म्हणाला होता, ‘फक्त माझी पगार वाढवा’; वाचा तो किस्सा