भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) टीम इंडियाच्या नवीन कोचिंग स्टाफची निवड केली आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या सूचनेनुसार, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये 3 नव्या दिग्गजांचा प्रवेश होणार आहे. या खेळाडूंमध्ये भारताचा अभिषेक नायर, नेदरलँडचे रायन टेन डोशेट आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मोर्ने मॉर्केल यांचा समावेश आहे. बीसीसीआयनं अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही, परंतु ‘क्रिकबझ’च्या रिपोर्टनुसार, हे 3 दिग्गज गौतम गंभीरसह कोचिंग स्टाफमध्ये सामील होतील. तर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप भारतीय संघासोबत कायम राहणार आहेत.
गौतम गंभीरसोबत केकेआरमध्ये असलेले अभिषेक नायर आणि टेन डोशेट यांना भारतीय संघात सहाय्यक प्रशिक्षकाची भूमिका मिळणार आहे. तर मॉर्नी मॉर्केल गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका निभावताना दिसणार आहे. फलंदाजी प्रशिक्षक कोण असेल हे अद्याप स्पष्ट झालं नसलं, तरी टी दिलीप हे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून कायम राहणार आहेत.
अभिषेक नायर आणि टी दिलीप 22 जुलै रोजी भारतीय संघासह श्रीलंकेला रवाना होतील, तर रायन टेन डोशेट देखील कोलंबोमध्ये थेट टीम इंडियामध्ये सामील होतील. ते सध्या लॉस एंजेलिस नाइट रायडर्सच्या कोचिंग स्टाफचा भाग आहेत. जर आपण मॉर्नी मॉर्केलबद्दल बोललो तर, बीसीसीआय आणि त्याच्यामध्ये चर्चा सुरू आहे आणि तो गोलंदाजी प्रशिक्षक होण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत त्याला लवकरच भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं जाऊ शकतं.
टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांची टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. टी20 मालिकेची सुरुवात 27 जुलै रोजी होईल. 28 जुलैला दुसरा सामना खेळला जाणार आहे. तर मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना 30 जुलै रोजी होणार आहे. टी20 मालिकेनंतर 2 ऑगस्टपासून एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. पहिला सामना 2 रोजी, दुसरा सामना 4 ऑगस्ट रोजी आणि शेवटचा सामना 7 ऑगस्ट रोजी खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
हार्दिक पांड्याचं भविष्य धोक्यात! टीम इंडिया पाठोपाठ मुंबई इंडियन्सचंही कर्णधारपद जाणार?
एकेकाळी पुढचा ‘सचिन’ म्हटलं जायचं, आता 24व्या वर्षीच संपलं या खेळाडूचं करिअर!
‘आलीशान कार आणि घर, वर्षाला करोडो रुपयांची कमाई’, नव्या कर्णधाराची एकूण संपत्ती जाणून व्हालं थक्क!