जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना अवघ्या 3 दिवसांवर आला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात इंग्लंडच्या के ओव्हल मैदानात 7 ते 11 जूनदरम्यान हा सामना पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघ कसून सराव करतोय. मात्र, भारतीय संघाच्या सरावात यावेळी आगळीवेगळी गोष्ट पाहायला मिळाली.
सध्या लंडनमधील ओरूंडेल वेस्ट ससेक्स या मैदानावर भारतीय संघ सराव करत आहे. तीन टप्प्यात भारतीय संघ येथे पोहोचला होता. त्यानंतर सर्व खेळाडूंनी एकत्रित सरावाला सुरुवात केली. यावेळी भारतीय खेळाडू या कसोटीसाठी वापरण्यात येणाऱ्या लाल चेंडू ऐवजी पिवळ्या व हिरव्या रंगाच्या चेंडूने क्षेत्ररक्षणाचा सराव करताना दिसून आले. या चेंडूंचा वापर स्लीपमध्ये उभ्या राहणाऱ्या क्षेत्ररक्षकांना सराव करून घेण्यासाठी केला जातोय. शुबमन गिल, विराट कोहली व पुजारा या चेंडूने सराव करताना दिसले.
इंग्लंडमधील वातावरणात चेंडू मोठ्या प्रमाणात स्विंग होतो. भारतीय संघ सरावात वापरत असलेले पिवळे व हिरवे रबरी चेंडू असेच स्विंग होतात. ज्यामुळे खेळाडूंना त्या परिस्थितीशी एकरूप होता येईल. तसेच चेंडूवर नजर राहण्यास देखील मदत होईल. याच कारणाने भारतीय खेळाडू अशा पद्धतीने सराव करताना दिसून येत आहेत. त्यावेळी भारत व ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ प्रथमच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करतील.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (यष्टीरक्षक)
स्टँडबाय खेळाडू : यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव
(Indian Cricket Team Practicing With Yello And Green Ball Ahead WTC Final Against Australia)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘त्या’ एका फोनमुळे हुकलं होतं सेहवागचं पदार्पण, नाहीतर शारजाहमध्ये आलं असतं वादळ
खेळाडूंवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटची एकाधिकारशाही आयपीएलमुळे संपली! डब्ल्यूटीसी फायनलआधी पॅट कमिन्सचे मोठे भाष्य