आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी भारताच्या 17 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत याचा खुलासा केला. या संघात काही धक्कादायक निर्णयही पाहायला मिळाले. जिथे केएल राहुल याला पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही संघात स्थान मिळाले. त्याचबरोबर 3 फिरकी गोलंदाजांना संघात स्थान मिळाले, ज्यामध्ये युझवेंद्र चहल आणि रवी अश्विन यांच्या नावाचा समावेश नाही.
संघाची घोषणा झाल्यानंतर पत्रकार परिषदेत उपस्थित असलेला कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ला याबाबत विचारले. रोहित म्हणाला की, “निवडीदरम्यान लेगस्पिनर आणि ऑफस्पिनर दोघांसाठी चर्चा झाली होती, पण आम्हाला अशा खेळाडूची निवड करायची होती, जो 8 किंवा 9 वर क्रमांकावर गोलंदाजीसोबत फलंदाजी करु शकतो.”
कर्णधार पुढे बोलताना म्हणाला की, “अक्षर पटेल (Axar Patel) ने या वर्षात खूपच उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याला संघात घेतल्याने आम्हाला डावखुऱ्या फलंदाजाचा फायदाही मिळणार आहे. संघ निवडताना आम्ही अश्विन आणि चहलबद्दल देखिल चर्चा केली. परंतू संघात केवळ 17 खेळाडूंना घेता येणार आहे. यामुळे संघात चहला संघात स्थान देणे कठीण झाले.” असेही रोहित म्हणाला.
अक्षर पटेलची यावर्षी वनडेतील कामगिरी
2023 मध्ये अक्षर पटेलची 50 षटकांच्या प्रकारामधील कामगिरीवर नजर टाकली तर त्याने 6 सामन्यात 16 च्या सरासरीने एकूण 64 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर गोलंदाजीत त्याला ५३.३३ च्या सरासरीने केवळ 3 बळी घेता आले आहेत. अक्षरला वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत वरच्या फळीत फलंदाजीची संधी मिळाली, मात्र तो फार काही करू शकला नाही.
अक्षर वनडे प्रकारात फार काही चांगली कामगिरी करू शकला नाही. तरी देखिल त्याला संघात स्थान मिळाले आहे. आश्विन आणि चहल सारख्या गोलंदाजांना संघी मिळाली नाही. अक्षरला मिळालेल्या संधीच सोन तो करतो की नाही हे पाहणे देखिल महत्वाचे ठरणार आहे. (indian cricket team skipper rohit sharma says we want left handed batsaman that is the reason chahal and ashwin not playing in asia cup)
महत्वाच्या बातम्या-
अखेर चौथ्या क्रमांकाचा प्रश्न सुटला! आशिया चषकासाठी राहुल अणि अय्यरचे संघात कमबॅक
आफ्रिदीचा टी10 मध्ये राडा! वयाच्या 43 व्या वर्षी केल्या 300 च्या स्ट्राईक रेटने धावा