---Advertisement---

Asia Cup 2023 । राहुल फिट नसताना संघात घेतले? पत्रकार परिषदेत अगरकरांकडून संकेत, सॅमसनला मिळणार संधी

On: सोमवार, ऑगस्ट 21, 2023 2:58 PM
Ajit Aagarkar Sanju Samson
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रमुख निवडकर्ते अजित आगरकर यांनी समोवरी (21 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेतली. या दोघांनी माध्यमांसमोर आगामी आशिया चषकासाठी संघ घोषित केली. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी आशिया चषक संघासाठी संघात पुनरागमन केले आहे. दुसरीकडे संजू सॅमनला राखीव खेळाडू म्हणून संघात घेतले गेले आहे. आगरकरांनी पत्रकार परिषदेत याबाबत एक मोठी प्रतिक्रिया देखील दिली.

केएल राहुल (KL Rahul) यावर्षी इंडियन प्रीमियर लीग खेळताना दुखापतग्रस्त झाला होता. दुसरीकडे श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळताना दुखापतग्रस्त झाला होता. दुखापतीनंतर दोघांवर शस्त्रक्रिया झाली असून मागच्या मोठ्या काळापासून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत राहुल आणि अय्यर फिटनेसवर काम करत होते. रोहित शर्मा (Rohit Sharma), अजित आगरकर (Ajit Agarkar) आणि निवड समितीने राहुल आणि अय्यरची फिटनेस पाहून त्यांना आशिया चषकासाठी संघात घेतले. मात्र, आगरकरांनी पत्रकार परिषदेत सांगितल्यानुसार राहुल सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकू शकतो. याच कारणास्तव संजू सॅमसन (Sanju Samson) याला राखीव खेळाडू म्हणून घेतल्याचेही आगरकरांकडून सांगितले गेले.

माध्यमांसमोर अजित आगरकर म्हणाले की, “केएल राहुल पूर्णपणे फिट असेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. आशिया चषकाच्या सुरुवातीच्या नाही, पण दुसऱ्या किंवा तिसऱ्या सामन्यासाठी तो फिट असू शकतो. म्हणूनच संजू सॅमसन याला राखीव खेळाडू म्हणून निवडले गेले आहे. श्रेयस अय्यरने फिटनेस चाचणी पार केली आहे.” (In the press conference, Ajit Agarkar gave important information about KL Rahul’s fitness.)

आशिया चषकासाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
राखीव खेळाडू – संजू सॅमनस

महत्वाच्या बातम्या –
आफ्रिदीचा टी10 मध्ये राडा! वयाच्या 43 व्या वर्षी केल्या 300 च्या स्ट्राईक रेटने धावा
BIG BREAKING! आशिया चषकासाठी टीम इंडियाची घोषणा, प्रमुख फलंदाजांचे संघात पुनरागमन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---