---Advertisement---

रोहितच्या कसोटी कर्णधारपदावर माजी निवडकर्त्याचे तिखट भाष्य, “मालिकांपूर्वीच दुखापत होते, असा कॅप्टन…”

On: शुक्रवार, जानेवारी 28, 2022 11:15 PM
Rohit-Sharma
---Advertisement---

भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कर्णधारपदाचा मुद्दा चर्चेचा विषय आहे. विराट कोहली (Virat Kohli)ने तिन्ही स्वरुपातील नेतृत्त्वपद सोडल्यानंतर वनडे आणि टी२० संघाची सुत्रे रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या हाती आली आहेत. मर्यादित षटकांच्या संघांपाठोपाठ कसोटी संघाची कमानही त्याच्याकडे सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर त्याला कसोटी संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करत बीसीसीआयने एकप्रकारे याचे संकेत दिले होते. परंतु त्यावेळी दुखापतीमुळे रोहित पूर्ण दौऱ्यातूनच बाहेर झाला होता.

तरीही त्याला कसोटी कर्णधारपदाचा प्रबळ दावेदार म्हणून (Rohit Sharma test Captaincy) पाहिले जात आहे. मात्र रोहितच्या नावापुढे फिटनेस हा (Rohit’s Fitness) सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. याच मुद्द्यावरून भारतीय संघाचे माजी निवडकर्ता सबा करीम (Saba Karim) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

व्हिडिो पाहा- द्रविडने लॉर्ड्सवर प्रसाद बरोबर लावलेली पैज १५ वर्षांनी केली पूर्ण

भारतीय संघाला त्यांची येती कसोटी मालिका फेब्रुवारी-मार्चमध्ये श्रीलंकाविरुद्ध मायदेशातच खेळायची आहे. अशात रोहितला कसोटी संघाच्या कर्णधाराच्या रूपात पाहिजे जात (Saba Karim On Rohit Sharma) आहे. परंतु करीम यांना वाटते की, रोहितला पूर्णवेळ कसोटी कर्णधार न करता त्याला काही वेळासाठीच कसोटी संघाचे नेतृत्त्वपद देण्यात यावे.

खेलनीति पॉडकास्टशी बोलताना माजी भारतीय यष्टीरक्षक म्हणाले की, रोहितला तिन्ही स्वरुपात जरी कर्णधार बनवले गेले, तरी हे काही कालावधीसाठीच असेल. भारतीय क्रिकेटसाठी वर्ष २०२३ खूप महत्त्वाचे वर्ष आहे. आपल्याला यावर्षी ५० षटकांचा विश्वचषक खेळायचा आहे आणि विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धाही याचदरम्यान संपेल. त्यामुळे भारतीय संघाने या चरणाचा विचार करून निर्णय घ्यायला पाहिजेत.  

रोहितला वनडे, कसोटी, टी२०चा कर्णधार बनवण्यावरून त्याच्या फिटनेसचा मुद्दा सतत पुढे येतो आहे. यावर करीम यांनीही जोर दिला आहे. ते म्हणाले की, रोहितसाठी सर्वात मोठे आव्हान हे आहे की, त्याने फिट राहायला पाहिजे. त्याच्यासाठी कर्णधारपद तर दूरच, तिन्ही स्वरुपात खेळणेदेखील अवघड काम आहे. तो आतापर्यंत खूप वेळा दुखापतग्रस्त झाला आहे आणि आताही पुनर्वसन कार्यक्रमातून जातो आहे. त्यामुळे कर्णधारपदी नियुक्ती करण्यासारखा मोठा निर्णय घेण्यापूर्वी फिजिओ, ट्रेनर आणि त्याच्या फिटनेसशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींसोबत चर्चा करणे गरजेचे आहे. आपण असा कर्णधार नाही निवडू शकत, जो आधीपासूनच जखमी आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

‘भारतीय क्रिकेट सुरक्षित हातात आहे’, वेस्ट इंडिजच्या दिग्गज कर्णधाराकडून रोहितवर कौतुकाची थाप

बल्ले..बल्ले..! भाऊ युसूफने ब्रेट लीला मारला ९५ मीटरचा षटकार, आनंदाने इरफानचा मैदानातच भांगडा

शास्त्रींच्या ‘नव्या इनिंग’वर शिंकली माशी, भारत वि. वेस्ट इंडिज कॉमेंट्री पॅनेलमधून राहावे लागले बाहेर

हेही पाहा-

द्रविडने लॉर्ड्सवर प्रसाद बरोबर लावलेली पैज १५ वर्षांनी केली पूर्ण | Bet between Dravid and Prasad

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---