बर्मिंघम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games)२०२२मधील क्रिकेटचा अंतिम सामना रविवारी (७ ऑगस्ट) पार पडला. या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. भारताला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून ९ धावांनी पराभव स्विकारावा लागला. नाणफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली. त्यांनी २० षटकात १६१ धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारत १९.३ षटकात १५२ धावांवरच सर्वबाद झाला. भारताने उपांत्य फेरीत यजमान संघ इंग्लंडचा पराभव करत शेवटची फेरी गाठली होती. अंतिम सामना एजबस्टनमध्ये खेळला गेला, तर वेस्ट इंडिज विरुद्ध खेळणाऱ्या भारतीय पुरूष संघाच्या ड्रेसिंग रूमचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
महिलांचा अंतिम सामना सुरू असताना वेस्ट इंडिज दौऱ्यातील भारतीय पुरूष संघाच्या ड्रेसिंग रूमचे वातावरण
भारतीय पुरूष संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. यावेळी भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये खेळाडू महिलांचा सामना पाहताना दिसले. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या सुवर्ण पदकांच्या सामन्यात भारताच्या विजयाची अपेक्षा होती. असा हा अतिमहत्वाचा सामना पाहताना भारतीय पुरूष संघातील खेळाडू दिसले आहेत. भारतीय क्रिकेट संघाने याचे काही फोटो त्याच्या सोशल मीडियाच्या अधिकृत अकांउटनर शेयर केले आहेत. ‘खूपच रोमांचक सामना’, असे कॅप्शन या फोटोला दिले आहे. तसेच हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे
Nail-biter at Edgbaston!
Senior Men's team is following #TeamIndia's progress in the #B2022 Final! 👍 👍#INDvAUS pic.twitter.com/TnOq9vcKXr
— BCCI (@BCCI) August 7, 2022
हरमनप्रीतची कर्णधार पदाला साजेशी खेळी
लक्ष्याचा विजयी पाठलाग करण्याच्या हेतून मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिने सर्वोत्तम कामगिरी केली. तिने ४३ चेंडूत ६५ धावा केल्या. भारताला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात तिचे योगदान महत्वापूर्ण होते. तसेच ऑस्ट्रेलियाकडून बेथ मूनी हिने ४१ चेंडूत ६१ धावा केल्या. हा सामना भारताने अवघ्या ९ धावांनी गमावला. यामुळे भारताचे सुवर्ण पदक जिंकण्याच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे. तर भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.
भारताचे २२व्या कॉमनवेल्थ गेम्सच्या हंगामात एकूण ५५ पदके झाली आहेत. यामध्ये १८ सुवर्ण, १५ रौप्य आणि २२ कांस्य पदकांचा समावेश आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कपिल देव यांनी सांगितले त्यांच्या फिटनेसचे रहस्य, युवा खेळाडूंनाही दिल्या टिप्स
‘आम्हाला संघात हे बदल करावे लागतील’, अंतिम सामन्यात पराभवानंतर कर्णधार हरमनप्रीतचे मोठे विधान
‘टी२० विश्वचषकात पराभवानंतर टीम इंडियाने काय बदल केले?’ आता खुद्द कॅप्टन रोहितनेच केले स्पष्ट