जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आर्यमन बिर्ला (Aryaman Birla) याने वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याची क्रिकेट कारकिर्द केवळ 2 वर्षे टिकली. भारताचा युवा फलंदाज आर्यमन बिर्लाची (Aryaman Birla) संपत्ती जवळपास 70 हजार कोटी रूपये आहे. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि विराट कोहलीसारखे (Virat Kohli) दिग्गज क्रिकेटपटू संपत्तीच्या बाबतीत त्याच्या जवळपासही नाहीत.
आर्यमन बिर्लाने (Aryaman Birla) 2019 मध्ये मानसिक आरोग्याचे कारण देत क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. मंगळवारी (3 डिसेंबर) रोजी त्याने निवृत्ती जाहीर केली. देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या आर्यमन बिर्लाला भारतीय संघ तसेच आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळू शकली नाही.
आर्यमनने 2017 मध्ये मध्य प्रदेशसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमधून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली. त्याने पहिल्याच सामन्यात चमकदार कामगिरी केली. 9 सामन्यांच्या 16 डावात त्याने 1 शतक, 1 अर्धशतकासह एकूण 414 धावा केल्या. कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर त्याचे शतक आहे. या शतकामुळे त्याने बंगालला ड्रॉ खेळण्यास भाग पाडले.
याशिवाय आर्यमनने 4 लिस्ट ए सामन्यात 36 धावा केल्या. तो शेवटचा 2019 मध्ये खेळताना दिसला होता. तो आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघात सामील झाला होता, परंतु त्याला आयपीएल सामना खेळण्याची संधी मिळू शकली नाही. दुखापत आणि मानसिक आरोग्यामुळे त्याने 2019 मध्ये विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. आर्यमन बिर्ला हा प्रसिद्ध उद्योगपती मंगलम बिर्ला यांचा मुलगा असून त्याने आपल्या वडिलांचा व्यावसायिक वारसा वाढवण्यासाठी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
SMAT; आयपीएल लिलावात अनसोल्ड ठरलेल्या स्टार खेळाडूने झळकावले शानदार शतक
18 वर्षाच्या फलंदाजाने आशिया कपमध्ये रचला इतिहास, उन्मुक्त चंदचा विश्वविक्रम मोडीत
सलग दोन ऑलिम्पिक पदक जिंकणारी चॅम्पियन खेळाडू होणार नववधू, या दिवशी लग्न बंधनात अडकणार