भारतीय संघाचा फलंदाज केदार जाधव याचे वडील महादेव जाधव हे सोमवारी (दि. 27 मार्च) बेपत्ता झाले होते. यानंतर जाधव कुटुंबीय चिंतेत होते. खरं तर, पुण्याच्या कोथरूड भागात राहणारे महादेव जाधव सकाळी 11.30च्या सुमारास घरातून बाहेर पडले होते. त्यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार पुणे पोलिसांकडे दिली असता, पुणे पोलिसांनी त्यांचा कसून शोध घेतला. अशात महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पोलिसांनी महादेव जाधव यांचा शोध घेतला आहे. पोलिसांनी त्यांच्या बेपत्ता होण्यामागील कहाणीदेखील सांगितली. केदार जाधव यानेही त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून वडील सापडल्याची माहिती दिली.
खरं तर, वाढत्या वयासोबत केदार जाधव याचे वडील महादेव जाधव (Kedar Jadhav Father Mahadev Jadhav) यांना गोष्टी लक्षात न राहणे आणि विचार करण्याची शक्ती कमी झाल्याची समस्या आहे. त्यामुळेच ते त्यांचे कुटुंबीय त्यांना घरापासून जास्त दूर जाऊ देत नाहीत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ते रक्षकाला चकवत घरापासून दूर जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यांचा फोनही बंद लागत होता. ते सकाळी 11.30 वाजेपासून बेपत्ता झाले. बराच शोध घेतल्यानंतरही जेव्हा त्यांची माहिती मिळाली नाही, तेव्हा याबाबत पुणे पोलिसांना (Pune Police) सांगण्यात आले.
अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) एफआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने समजले की, ते शेवटचे कर्वे नगर भागात दिसले होते. अधिक तपास घेतला असता केदार जाधव याचे वडील कोथरूड पोलीस स्टेशनला सापडले. (indian cricketer kedar jadhav father mahadev jadhav traces by pune police read here)
https://twitter.com/CricCrazyJohns/status/1640418232724246528
केदार जाधवची कारकीर्द
येत्या 31 मार्चपासून इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला सुरुवात होत आहे. मात्र, केदार जाधव (Kedar Jadhav) या स्पर्धेचा भाग नाहीये. तो शेवटचा आयपीएल 2021मध्ये खेळताना दिसला होता. त्याच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने भारताकडून 73 वनडे आणि 9 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने वनडेत 42.09च्या सरासरीने 1389 धावा केल्या आहेत. वनडेत त्याच्या नावावर दोन शतकांचाही समावेश आहे. तसेच, टी20त 122 धावा केल्या आहेत. त्याने शेवटचा वनडे सामना 2020, तर शेवटचा टी20 सामना 2017मध्ये खेळला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या खेळाडू देशासाठी…’, डब्ल्यूपीएल जिंकल्यानंतर हरमनप्रीत कौरने कुणाचे केले कौतुक
ठरलं! यावर्षी आयपीएलमध्ये चार संघांना मिळणार नवीन कर्णधार, रोहित दिसणार जुन्याच भूमिकेत






