भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू केदार जाधव गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. पण असे असले तरी त्याने त्याच्या कारकिर्दीतील एक नव्या पर्वाला सुरुवात केली आहे. केदारने पुण्यात त्याची क्रिकेट अकादमी सुरु केली आहे. याबद्दल त्यानेच सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे.
केदारने पुण्यातील कोथरुड येथे रविवारी (१४ मार्च) त्याच्या क्रिकेट अकादमीचे उद्घाटन केले आहे. यावेळी त्याचे कुटुंबिय देखील उद्घाटन समारंभासाठी उपस्थित होते.
केदारने त्याच्या क्रिकेट अकदामीबाबत इस्टाग्रामवर पोस्ट केली आहे की ‘नवीन प्रवासाला सुरुवात झाली आहे. खेळाडूच्या कारकिर्दीत सराव आणि प्रशिक्षण मोठे योगदान देतात. उदयोन्मुख क्रिकेटपटूंना चांगल्या सुविधा देण्याचे माझे स्वप्न अखेर सत्यात उतरत आहे. सर्व आंतरराष्ट्रीय सुविधांनी सुसज्ज अशी केदार जाधव क्रिकेट अकादमी खेळाडूंना त्यांच्या यशस्वी क्रिकेट प्रवास घडवण्यासाठी व्यासपीठ देण्यास सज्ज आहे.’ याबरोबरच केदारने या अकादमीचे उद्घाटन करतानाचे फोटोही शेअर केले आहेत.
https://www.instagram.com/p/CMZkEHdL_Yf/
केदार सनरायझर्स हैदराबादचा भाग
एप्रिलमध्ये सुरु होणाऱ्या आयपीएलच्या १४ व्या हंगामात केदार सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग असणार आहे. तो गेले ३ वर्षे चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत होता. पण १४ व्या हंगामाच्या लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्सने त्याला मुक्त केले. त्यामुळे केदार लिलावात उतरला होता. यावेळी लिलावात सनरायझर्स हैदराबादने त्याला २ कोटीच्या मुळकिंमतीत खरेदी केले.
केदारची कारकिर्द
केदारने आत्तापर्यंत त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ७३ वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने ४२.०९ च्या सरासरीने १३८९ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या २ शतकांचा आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने २७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर ९ आंतरराष्ट्रीय टी२० सामने त्यानं खेळले असून १२२ धावा केल्या आहेत. याचबरोबर त्याने ८७ आयपीएल सामने खेळले असून ११४१ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
सात वर्षांनंतर ‘इंडो-पाक एक्सप्रेस’ एकत्र; मात्र पहिल्याच फेरीत बसला पराभवाचा धक्का
दंगल गर्लच्या बहिणीची आत्महत्या! ‘हे’ कारण आले समोर
‘तो’ धक्कादायक व्हिडिओ पाहून हरभजन सिंग भडकला; म्हणाला, ‘अशा मुलांना जगण्याचा अधिकार नाही’