मागील काही काळापासून दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर असणारा श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकला. अय्यरने इंदोर येथे पार पडलेल्या दुसऱ्या वनडेत शानदार शतक झळकावले. तसेच, दाखवून दिले की, तो लयीत आला आहे. या सामन्यात अय्यरने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली. हा सामना भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार 99 धावांनी जिंकला. या सामन्यानंतर अय्यरला विचारण्यात आले की, तो विराट कोहली याची जागा घेणार आहे का? यावर त्याने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले.
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हा बराच काळ दुखापतीने ग्रस्त होता. तो दुखापतीमुळे आयपीएल 2023 स्पर्धेतही खेळू शकला नव्हता. तसेच, थेट आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत परतला होता. त्याला पाकिस्तानविरुद्ध पहिल्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र, तो जास्त धावा करू शकला नव्हता. तसेच, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेतही त्याने जास्त धावा केल्या नव्हत्या. मात्र, दुसऱ्या वनडेत त्याने कोणतीही चूक केली नाही आणि शानदार शतक साकारले. त्याने 90 चेंडूत 3 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 105 धावांची सर्वात मोठी खेळी साकारली. या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
‘मी विराटची जागा घेऊ शकत नाही’
श्रेयस अय्यर याच्यानुसार, त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी (Batting At No. 3) करताना शतक ठोकले आहे, पण तो विराट कोहली (Virat Kohli) याची जागा घेऊ शकत नाही. तो म्हणाला, “मी संघासाठी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी तयार आहे. संघ जे सांगेल, ते मी करेल. विराट कोहली महान खेळाडूंपैकी एक आहे आणि त्याच्याकडून तिसरे स्थान चोरण्याची कोणतीही संधी नाही.”
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 5 विकेट्स गमावत 399 धावा केल्या होत्या. पावसाच्या व्यत्ययामुळे ऑस्ट्रेलियाला 33 षटकात 317 धावांचे आव्हान मिळाले होते. मात्र, त्यांना 28.2 षटकात सर्व विकेट्स गमावत 217 धावाच करता आल्या. अशाप्रकारे भारताने हा सामना डकवर्थ लुईस नियमानुसार 99 धावांनी जिंकला. तसेच, भारतीय संघाने मालिकेत 2-0ने आघाडी घेतली. (indian cricketer shreyas iyer reacts on taking virat kohli number three spot)
महत्त्वाच्या बातम्या-
हरमनसेनेनं घडवला इतिहास! भारतीय संघाने Asian Gamesमध्ये पटकावलं पहिलं-वहिलं Gold Medal
‘बूम बूम’ बुमराहचा 2019 वर्ल्डकपमधला ‘तो’ रेकॉर्ड, अनेकांना माहितीच नाही; तुम्हीही घ्या जाणून