भारतीय क्रिकेटपटू मैदानात आक्रमक असलेले आपण पाहिले आहे. परंतु याउलट ते आपल्या वैयक्तिक आयुष्यात फार शांत राहतात. तसेच खेळाडू आपल्या स्वत:च्या स्टाईलबद्दल जितके जागरूक असतात तितकेच ते आपल्या कुटुंबातील व्यक्तींनाही स्टाईलमध्ये ठेवतात.
केएल राहुल, हार्दिक पंड्या, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, विजय शंकर, पृथ्वी शाॅ, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे व जसप्रीत बुमराह हेच खेळाडू अविवाहित आहेत.
भारतीय संघात असे काही खेळाडू आहेत, ज्यांनी लग्न केले आहे. तसेच काही खेळाडू असेही आहेत ज्यांना मुलेदेखील आहेत. अशाप्रकारे आपण या लेखात खेळाडूंच्या मुलांची नावे पाहणार आहोत. तसेच या नावांची अर्थही जाणून घेणार आहोत.
एमएस धोनी- झिवा धोनी
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीची (MS Dhoni) मुलगी आपल्या वडिलांप्रमाणेच अगदी स्टायलीश आहे. धोनीने आपल्या लाडक्या मुलीचे नाव झिवा (Ziva) ठेवले आहे. या नावाचा अर्थ प्रशस्त (लक्झरी) असा होतो.
https://www.instagram.com/p/B5E5bqQHvc_/?utm_source=ig_web_copy_link
हरभजन सिंग- हिनाया हीर
भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज हरभजन सिंग (Harbhajan Singh) एका मुलीचा वडील आहे. तसेच हरभजन आणि त्याची पत्नी गीता बसराने आपल्या मुलीचे नाव हिनाया हीर (Hinaya Heer) ठेवले आहे. या नावाचा अर्थ अभिव्यक्ती असा होतो.
https://www.instagram.com/p/B9ihGD2hm8h/?utm_source=ig_web_copy_link
सुरेश रैना- ग्रेसिया व रियो
भारतीय संघाचा खेळाडू सुरेश रैनालादेखील (Suresh Raina) एक मुलगी आहे. तिचे नाव त्याने ग्रेसिया (Grecia) असे ठेवले आहे. याचा अर्थ देवाची कृपा असा होतो. २३ मार्च रोजी रैनाला पुत्ररत्न प्राप्त झाले असून त्याचे नाव रियो असे ठेवले आहे.
https://www.instagram.com/p/B_pSeVChAcN/
गौतम गंभीर- आझीन व अनायझा
भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि सध्याचा खासदार गौतम गंभीरला (Gautam Gambhir) दोन मुली आहेत.मोठ्या मुलीचे नाव त्याने आझीन (Aazeen) असे ठेवले आहे. याचा अर्थ सुंदरता असा होतो. तसेच गंभीरची मोठी मुलगी आपल्या नावाप्रमाणेच खूप सुंदर आहे. तर गंभीरच्या दुसऱ्या मुलीचा जन्म २०१७मध्ये झाला आहे. तसेच तिचे नाव अनायझा आहे.
https://www.instagram.com/p/B3V8GpwAEew/
ट्रेंडिंग घडामोडी-
-राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळालेले महाराष्ट्रीयन खेळाडू
-वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ महाराष्ट्रीयन खेळाडू
-चहलने रोहितला दिल्या अशा शुभेच्छा, रितीकाही झाली नाराज