---Advertisement---

क्रिकेटशी जवळचे नाते असणारे राजू श्रीवास्तव; निधनानंतर भारतीय खेळाडूंनी वाहिली श्रद्धांजली

On: बुधवार, सप्टेंबर 21, 2022 12:45 PM
---Advertisement---

भारतीय मनोरंजन क्षेत्रातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे. मागील एक महिन्यापासून  मृत्यूशी झुंज देणारे प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Shrivastav) यांनी बुधवारी (21 सप्टेंबर) अखेर शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मनोरंजन जगताला मोठा दुःखद धक्का बसला आहे. सोशल मीडियावर अनेकजण त्यांचे फोटो शेअर करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. विनोदाच्या क्षेत्रात आपली अमिट छाप सोडणारे राजू हे क्रिकेटचे देखील तितकेच मोठे चाहते होते. आपल्या सुरुवातीच्या काळात आपण क्रिकेट कॉमेंट्री करायचं असे देखील त्यांनी आवर्जून सांगितले होते.

स्टॅन्ड अप कॉमेडी हा विनोदाचा प्रकार भारतात प्रसिद्ध करण्यात राजू श्रीवास्तव यांचा मोठा हातभार होता. त्यांनी आपल्या एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की,

“मी चांगला बोलायचं त्यामुळे मला गल्लीत क्रिकेट कॉमेंट्री करण्यासाठी बोलावले जायचे. त्यावेळी मला क्रिकेटची तितकी इत्यंभूत माहिती नव्हती. क्रिकेटच्या फटक्यांना काय म्हणतात हे देखील माहित नव्हते. मात्र, खेळाडूंना मी वैयक्तिकरित्या ओळखत असल्याने, त्यांच्याबाबतच्या काही गमती जमती आणि चुटकुले सांगून कॉमेंट्री करत वेळ मारून न्यायचो.”

 

प्रसिद्ध कलाकार झाल्यानंतरही राजू श्रीवास्तव हे क्रिकेटपटू आणि क्रिकेटवर विनोद करताना दिसून यायचे. त्यांच्या अनेक शोमध्ये ते भारतीय क्रिकेटपटूंची मिमिक्री तसेच त्यांच्या खेळाच्या नकला करून देखील दाखवत असायचे. त्यांच्या निधनानंतर भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन यांनी सर्वप्रथम ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. भारताचा दिग्गज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग तसेच माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रेना यांनी देखील ट्विट करत त्यांना आदरांजली अर्पण केली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
एकेवेळी अतिशय मोठी शारिरीक समस्या असलेला गेल पुढे झाला ‘युनिवर्सल बॉस’
‘एवढ्या धावा केल्या, तरीही…’, कर्णधार रोहितने ‘यांच्या’ डोक्यावर फोडले पराभवाचे खापर
अस काय घडलं की भर मैदानात रोहितने पकडला कार्तिकचा गळा? पाहा व्हिडिओ 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---