जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा १४ वा हंगाम (आयपीएल) कोविड-१९ च्या भारतातील दुसऱ्या लाटेमुळे स्थगित केला गेला आहे. विविध संघांतील खेळाडू आणि कर्मचारी यांचे कोरोना अहवाल सकारात्मक आल्याने ४ मे पासून २९ सामने खेळल्यानंतर ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. त्याचवेळी, आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जेम्स पॅमेंट यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
भारतीय खेळाडूंना ‘ही’ गोष्ट आवडत नाही
मागील दोन वर्षापासून मुंबई इंडियन्सच्या क्षेत्ररक्षक प्रशिक्षकपदाची भूमिका निभावणाऱ्या जेम्स पॅमेंट यांनी आयपीएल स्थगित झाल्यानंतर एक महत्त्वपूर्ण विधान केले. पॅमेंट म्हणाले, “काही भारतीय खेळाडूंना बायो बबलमध्ये लादण्यात आलेल्या नियमांनुसार राहण्यास आवडत नाही. मात्र, मला एकदाही असुरक्षित वाटले नाही. माझे म्हणणे आहे की, बायो बबलमधील सुरक्षेच्या बाबतीत कोणता समझोता केला जात नाही. सीएसकेच्या गोटात कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळल्यानंतर आम्ही काहीसे घाबरलो होतो. कारण काही दिवसांपूर्वीच आम्ही त्यांच्या संपर्कात आलेलो.”
न्यूझीलंडमध्ये नॉदर्न डिस्ट्रिक संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेले पॅमेंट पुढे म्हणाले, “भारतात कोरोनाचे रुग्ण आहेत हे आम्हाला माहीत होते. त्यावेळी ही स्पर्धा सहा शहरात घेणे काहीसे धोक्याचे होते. त्याऐवजी, संपूर्ण स्पर्धा मुंबईतील वेगवेगळ्या स्टेडियमवर घ्यायला हवी होती. तसेच, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तब्बल ७०,००० हजार प्रेक्षकांना मैदानात प्रवेश देणे चुकीचे होते.”
अचानकपणे आयपीएल करावी लागली स्थगित
आयपीएल २०२१ ऐन भरात आली असताना विविध संघांचे खेळाडू आणि कर्मचारी एकापाठोपाठ कोरोना पॉझिटिव आल्याने २९ सामन्यांनंतर स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. उर्वरित स्पर्धा पुन्हा आयोजित करण्यात येईल का याविषयी बीसीसीआय विचार करताना दिसतेय. सध्या श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती व इंग्लंड असे तीन पर्याय बीसीसीआय पुढे आहेत. स्पर्धा पूर्ण न झाल्यास बीसीसीआयला तब्बल २५०० कोटींचा तोटा होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
दिल्ली आणि अहमदाबादमध्ये आयपीएलचे सामने खेळवण्याचा हट्ट बीसीसीआयला भोवला?
महिलांच्या क्रिकेटबाबत दुजाभाव करत असल्याचा आरोप, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने दिले हे उत्तर
या मैदानावर होतील भारत विरूद्ध श्रीलंकेचे सामने