भारतात क्रिकेट हा केवळ एक खेळ नसून तो सर्व भारतीयांचा एक अविभाज्य घटक आहे. त्यामुळे भारतीय चाहते जितकं क्रिकेट बघतात, तेवढेच त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूला फोलो करतात. चाहते आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंच्या प्रत्येक गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. जसे की, त्यांचा पेहराव, घर, गाडी, फोटो, व्हिडिओ आणि यांसारख्या बऱ्याच गोष्टी. आज आपण बघूयात भारताच्या क्रिकेटपटूंकडील सर्वात महागड्या गाड्या. (Indian Cricketers Have The Most Expensive And Luxurious Car Collection)
युवराज सिंग
‘सिक्सर किंग’ युवराजला गाड्यांची आवड पूर्वीपासूनच होती. त्याच्याकडे एका पेक्षा एक गाड्यांचा संग्रह आहे. त्याचा संग्रहामध्ये ‘बीएमडब्ल्यू एक्स६एम, बीएमडब्ल्यू एम३, बीएमडब्ल्यू एम५ ६०, ऑडी क्यू ५, बेंटली फ्लाइंग स्पर, आणि लँबोर्घिनी यांसारख्या अनेक गाड्या आहेत. यामध्ये त्याची सर्वात आवडती गाडी लँबोर्घिनी आहे. युवराज सर्वात जास्त तीच गाडी चालवताना दिसतो.
https://www.instagram.com/p/CQLN0wVDaMX/?utm_source=ig_web_copy_link
एम एस धोनी
सर्वाना माहित आहे की, भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीला बाईक्सची खूपच आवड आहे. परंतु धोनीकडे सुद्धा फोर व्हीलर गाड्या आहेत. धोनीकडे ऑडी ७, मित्सुबिशी पजेरो एसएफएक्स, रेंज रोवर फ्रीलँडर २, फेरारी ५९९ जीटीओ आणि जीप यांसारख्या गाण्या आहेत. या व्यतिरिक्त धोनीकडे ‘हमर एच२’ ही गाडी सुद्धा आहे. या गाडीची किंमत जवळपास ७५ लाख रुपये आहे.
https://www.instagram.com/p/BKYeNVIB3NP/?utm_source=ig_web_copy_link
विराट कोहली
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सुद्धा या यादीत मागे नाही. सध्या कोहली जगातील श्रीमंत खेळाडूंपैकी आहे. कोहलीकडे सुद्धा फोर व्हीलर गाड्यांचे संग्रह आहेत. कोहली हा ऑडी इंडियाचा ब्रँड एंबेसेडर आहे. कोहलीकडे ‘ऑडी क्यू ८, ऑडी क्यू ७, रेंज रोवर आणि , बेंटली फ्लाइंग स्पर’ यांसारख्या महाग गाड्यांचे संग्रह आहेत.
https://www.instagram.com/p/BhbxF9OAJ4s/?utm_source=ig_web_copy_link
हार्दिक पंड्या
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याकडे सुद्धा महागड्या गाड्यांचे संग्रह आहेत. रेंज रोवर आणि मर्सिडीज एएमजी जी ६३ या दोन महागड्या गाड्या आहेत. यासोबतच त्याचाकडे अशी एक गाडी आहे, ज्या गाडीची चर्चा नेहमीच होत असते. ती गाडी म्हणजे लँबोर्घिनी हरीकॅन ईवो होय. या गाडीची किंमत जवळपास ३.७३ करोड आहे.
https://www.instagram.com/p/B4o8xIzF4ch/?utm_source=ig_web_copy_link
सचिन तेंडुलकर
भारतीय संघाचा ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरकडे पूर्वीपासून खूप गाड्यांचे संग्रह आहेत. सचिन बीएमडब्ल्यू इंडियाचा ब्रँड एंबेसेडर आहे.
The master's luxurious stroke. @sachin_rt with his all-new #BMW 7 Series 750Li M Sport customized by BMW Individual. pic.twitter.com/gbl0fEAfS8
— BMW India (@bmwindia) September 19, 2016
सचिनकडे बीएमडब्ल्यू एम ५, बीएमडब्ल्यू एम६ आणि बीएमडब्ल्लू आय८ गाडी यांसारख्या अनेक गाड्या आहेत. त्याच्या बीएमडब्ल्यू आय८ या गाडीची किंमत जवळपास २.६२ करोड आहे.
महत्वाच्या बातम्या
WTC Final: कोहली अन् शास्त्रींची प्लेइंग इलेव्हनची निवड फसली? साउथम्पटनची खेळपट्टी करतेय इशारा
नादच खुळा! अश्विन- जडेजाची जोडी बनेल भारतीय संघासाठी ब्रह्मास्त्र, ३५ कसोटीत घेतल्यात ३६२ विकेट्स
भारत-न्यूझीलंड फायनलवर संकटाचे ‘काळे ढग’, पहिल्या दिवसाचा खेळ उशिरा सुरू होण्याचे संकेत