भारताचा माजी क्रिकेटपटू अमित मिश्रा यानं एका मुलाखतीत आपण वयात फसवणूक केल्याचं कबूल केलं आहे. मिश्रा यानं सांगितलं की, एकेकाळी त्याचं करिअर संपण्याच्या मार्गावर होतं. त्यामुळे अशा कठीण काळात त्यानं प्रशिक्षकाच्या सल्ल्यानं वय एक वर्ष कमी केलं.
भारतात चुकीचं वय दाखवून वेगवेगळे लाभ घेण्याच्या घटना वारंवार घडतात. अशा प्रकारची फसवणून गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र यामुळे अनेक खेळाडूंना योग्य संधी मिळत नाही. या बातमीत आम्ही तुम्हाला अशा क्रिकेटपटूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी त्यांच्या वयात फसवणूक केली आहे.
अमित मिश्रा – अमित मिश्रानं 2003 मध्ये भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यावेळी त्यानं आपलं वय 21 वर्षे असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र प्रत्यक्षात तो 22 वर्षांचा होता.
मनजोत कालरा – 2018 मध्ये भारताला चौथा अंडर-19 विश्वचषक मिळवून देणाऱ्या मनजोत कालरा याच्यावर वयाच्या फसवणूक आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी 2020 मध्ये त्याच्यावर खेळण्यास बंदीही घालण्यात आली होती.
रसिक दार – 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधील रसिक दार देखील वयाच्या फसवणुकीत दोषी आढळला होता. त्यामुळे त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. रसिकनं आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केलं. त्यावेळी त्याचं वय 17 वर्ष असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र प्रत्यक्षात त्याचं वय 20च्या आसपास होतं. रसिक सलाम आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला.
नितीश राणा – 2021 मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण करणाऱ्या नितीश राणानंही त्याच्या वयात फसवणूक केली होती, ज्यामुळे बीसीसीआयनं त्याच्यावर वयोगटातील क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळण्यास बंदी घातली होती.
अंकित बावणे – क्रिकेटपटू अंकित बावणेनंही अशी फसवणूक केली आहे. बावणे याची अधिकृत जन्मतारीख 17 डिसेंबर 1992 आहे. मात्र पासपोर्टमध्ये ती 1 सप्टेंबर 1992 अशी नोंदवण्यात आली. यामुळे त्याची 2012 च्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये निवड झाली नाही.
प्रिन्स राम निवास यादव – दिल्लीचा क्रिकेटपटू प्रिन्स राम निवास यादववर बीसीसीआयनं देशांतर्गत क्रिकेटमधून दोन हंगामांसाठी बंदी घातली होती. त्यानंही वयाची गडबड केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताच्या माजी क्रिकेटपटूचा गडबड घोटाळा! प्रशिक्षकाच्या मदतीनं केली वयात फसवणूक
सूर्यकुमार कर्णधार झाला तर उपकर्णधार कोण होणार? बुमराह-पंतसह हे 5 खेळाडू शर्यतीत
10 षटकात 250 धावा… दोघांनी ठोकली शतकं..!! अशी फलंदाजी स्वप्नातही पाहिली नसेल