---Advertisement---

200 पेक्षा जास्त वनडे सामने खेळणारे भारतीय क्रिकेटपटू, ज्यांना एकही वनडे विश्वचषक जिंकता आला नाही

Rohit Sharma
---Advertisement---

भारतीय संघ वनडे विश्वचषक 2023मध्ये विजेतेपद मिळवू शकला नाही. कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वात संघाने संघातील सुरुवातीचे सलग 10 सामने जिंकले होते. पण अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 विकेट्सने पराभव स्वीकारला. अंतिम सामन्याती पराभवानंतर रोहित शर्मा विश्वचषक न जिंकता आलेल्या दिग्गजांच्या यादीत सामील झाला आहे.

रोहित शर्मा याची वनडे क्रिकेटमधील कारकीर्द मोठी राहिली आहे. भारतासाठी वनडे क्रिकेटमध्ये 200 पेक्षा जास्त सामने खेळणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्मा याचेही नाव आहे. या 14 खेळाडूंपैकी फक्त सहा सहा खेळाडू असे आहेत, ज्यांनी वनडे विश्वचषक जिंकला नाहीये. रोहित ही नकोशी कामगिरी करणारा सहावा फलंदाज ठरला आहे.

वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी 200 पेक्षा जास्त सामने खेळणाऱ्यांमध्ये सचिन तेंडुलकर (463 सामना), एमएस धोनी (347), राहुल द्रविड (340), मोहम्मद अजहरुद्दीन (334), सौरव गांगुली (308), युवराज सिंग (301), विराट कोहली (292), अनिल कुंबळे (269), रोहित शर्मा (262), विरेंद्र सेहवाग (241), हरभजन सिंग (234), जवागल श्रीनाथ (229), सुरेश रैना (226) आणि कपिल देव (225) यांचा समावेश आहे. या 14 खेळाडूंपैकी द्रविड, अजहरुद्दीन, गांगुली, कुंबळे, जवागल श्रीनाथ आणि रोहित शर्मा हे विश्वचषक विजयाचा अनुभव घेऊ शकले नाहीत. रोहित शर्मा अजून वनडे क्रिकेटमधून निवृत्त झाला नाहीये. पण आगामी वनडे विश्वचषकात तो खेळेल, याची शक्यता फारच कमी आहे. अशात रोहितचे नाव 200पेक्षा अधिक वनडे सामने खेळून विश्वचषक न जिंकणाऱ्या भारतीयांमध्ये निश्चित झाल्याचे दिसते.

दरम्यान, रोहितच्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्याने आतापर्यंत भारतासाठी 52 कसोटी, 262 वनडे आणि 148 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे 3677, 10709 आणि 3853 वनडे धावा केल्या आहेत. कर्णधार म्हणून रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. पण भारतासाठी अद्याप एकही आयसीसी ट्रॉफी जिंकू शकला नाहीये. पुढच्या वर्षी टी-20 विश्वचषकात रोहित भारताचे नेतृत्व करणार की नाही, हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. मागच्या एक वर्षापासून त्याने एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाहीये. (Indian cricketers who have played more than 200 ODI matches, but have not won a single ODI World Cup)

महत्वाच्या बातम्या – 
पुढच्या वर्ल्डकपवेळी किती वयाचे असतील दिग्गज भारतीय खेळाडू? पाहा चक्रावणारे आकडे, एक तर चाळिशीत…
सूर्याला भारताच्या टी20 संघाचा कॅप्टन बनवताच अश्विनची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---