क्रिकेटचा टी२० प्रकार तसा नवा. वेग व षटकांची संख्येमुळे या प्रकारात फारच कमी खेळाडू शतकी खेळी करतात. तसेच टी२०मधील बरेच खेळाडू हे कसोटी क्रिकेटमध्ये फारच कमी खेळताना दिसतात.
त्यामुळे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतकी खेळी करणे तसे नक्कीच सोप्पे नाही. काही खेळाडूंना कसोटीत व वनडेत संधी मिळते तर काहींना फक्त वनडे व टी२०मध्ये.
अशातच फलंदाजीमधील क्रमवारी ही शतकी खेळीसाठी टी२० सारख्या प्रकारात नक्कीच अडथळा ठरु शकते. Indian Cricketers who have scored centuries in all three formats.
या लेखात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारत शतके करणाऱ्या भारतीय खेळाडूंची ओळख आपण करुन घेणार आहोत.
३. सुरेश रैना (Suresh Raina)
भारताकडून मे २०१०मध्ये सुरेश रैनाने पहिल्यांदा टी२० क्रिकेटमध्ये शतकी खेळी केली. त्यावेळी टी२०मध्ये शतकी खेळी करणारा तो ख्रिस गेल व ब्रेंडन मॅक्क्युलमनंतरचा तिसरा फलंदाज होता. यानंतर जुलै २०१०ला कसोटीत शतकी खेळी करुन भारताकडून तिन्ही प्रकारात शतकी खेळी करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला होता.
२. केएल राहुल (KL Rahul)
केएल राहुलने आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये आपले पहिले शतक २०१६ तर दुसरे टी२० शतक २०१८साली केले. जेव्हा त्याने २०१६मध्ये टी२०मध्ये शतकी खेळी केली. तेव्हा भारताकडून या तिन्ही प्रकारात शतकी खेळी करणारा तो तिसरा खेळाडू ठरला होता. सध्या त्याच्या नावावर टी२०मध्ये २, वनडेत ४ व कसोटीत ५ शतके आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारत २ शतके करणारा तो ब्रेंडन मॅक्क्युलम, मार्टिन गप्टील व ख्रिस गेलबरोबर केवळ चौथा खेळाडू आहे.
१. रोहित शर्मा (Rohit Sharma)
रोहित शर्माने टी२०मधील आपले पहिले शतक २०१५ साली केले. याबरोबर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतके करणारा तो दुसरा भारतीय ठरला. विशेष म्हणजे टी२० प्रकारात त्याने ४ आंतरराष्ट्रीय शतके केली आहे. रोहितच्या नावात कसोटी ६ तर वनडेत २९ शतके आहेत. त्यामुळे तिन्ही प्रकारात ४ कमीतकमी ४ शतके करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
–टी२० क्रिकेटमध्ये एकाही शतकाशिवाय सर्वाधिक अर्धशतके करणारे ३ फलंदाज
–२००७ विश्वचषकातील हिरो म्हणतोय यावेळीचा टी२० विश्वचषक खेळणारचं
-सचिनला आऊट झाला की हा खेळाडू करायचा रडायला सुरुवात
-आणि युवराजने बसमधील सिटवर बसलेल्या रोहितला उठवले
-कसोटी, वनडे व टी२० प्रकारात ५०पेक्षा जास्त सरासरी असलेले खेळाडू