भारतात क्रिकेट क्षेत्रात संधी मिळाली म्हणजे सहसा खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडतोच. तसेच आता आयपीएल स्पर्धेमुळे नवख्या खेळाडूंवरही कोटींची बोली लावली जाते. आयपीएल स्पर्धेबद्दल असेही म्हटले जाते की, आयपीएल स्पर्धेत खेळणारा खेळाडू रातोरात श्रीमंत होऊन जातो. परंतु वर्तमान काळात भारतीय संघात असेही खेळाडू आहेत, जे मोठ्या घराण्यातील आहेत किंवा स्वतः एक प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. तर असे देखील खेळाडू आहेत जे अब्जावधी घराण्याचे जावई आहेत.
चला तर पाहुयात असे काही क्रिकेटपटू
१) रवींद्र जडेजा : भारतीय संघाचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजा हा जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. तो भारतीय संघाच्या विजयात फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये महत्वाची भूमिका बजावत असतो. रवींद्र जडेजा आपल्या राजपुताना थाटसाठी प्रसिद्ध आहे. परंतु त्याने ही गोष्ट मिळवण्यासाठी आयुष्यात खूप मेहनत घेतली आहे. जडेजा २०१६ मध्ये रीवा सोबत विवाह बंधनात अडकला होता. रीवा देखील मॅकेनिकल इंजिनियर आहे. यासोबतच ती गुजरातच्या प्रसिद्ध राजनैतिक कुटुंबातून आहे. तसेच तिचे कुटुंब गुजरातच्या सर्वात श्रीमंत कुटुंबापैकी एक आहे.
२) गौतम गंभीर : भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर याने गेल्या काही वर्षातच भारतीय संघाला रामराम केले होते. तो जितका चांगला फलंदाज आहे, तितकाच चांगला व्यक्ती देखील आहे. गंभीर देखील श्रीमंत कुटुंबाचा जावई आहे. त्याने २०११ मध्ये नताशा जैन सोबत विवाह केला होता. नताशाच्या वडिलांचा दिल्लीमध्ये टेक्सटाइलचा मोठा बिजनेस आहे. तसेच तिचे वडील दिल्लीतील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांपैकी एक आहेत.
३) चेतेश्वर पुजारा : वर्तमानकाळात भारतीय कसोटी संघाची भिंत म्हणून ओळख निर्माण केलेला फलंदाज चेतेश्वर पुजाराला बाद करण्यासाठी भल्याभल्या गोलंदाजांना घाम फुटू लागतो. पुजाराने देखील कोट्यावधींची कमाई केली आहे. तसेच त्याने २०१३ मध्ये पूजा पाबरीसोबत विवाह केला होता. पुजाच्या वडिलांचा देखील टेक्सटाइलचा मोठा बिजनेस आहे, ज्यामध्ये त्यांची वार्षिक कमाई अब्ज रुपये आहे.
४) इरफान पठाण : भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी ही तो क्रिकेटमध्ये सलामोचान करून कोट्यावधी रुपये कमवत आहे. त्याने २०१६ मध्ये सौदी अरेबियाची मॉडेल सफा बेगसोबत विवाह केला होता. तिचे वडील मिर्जा फारुख बेग जेद्दा शहरातील मोठे व्यापारी आहेत.
५) हरभजन सिंग : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंग देखील अब्जावधी घराण्याचा जावई आहे. त्याने २०१५ मध्ये बॉलिवुड अभिनेत्री गीता बसरा सोबत विवाह केला होता. अनेकांना असे वाटते की, गीता बसरा फक्त एक अभिनेत्री आहे. परंतु तिच्या वडिलांचा इंग्लंडमध्ये खूप मोठा बिजनेस आहे. या बिजनेसमधून त्यांची वर्षाला जवळपास अब्जावधी रुपयांची कमाई होते.
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्याच्या’मुळेच सीएसके संघ यंदा आयपीएलमध्ये टिकून राहू शकला, पाहा दिग्गजाने कोणाची केली स्तुती
भर सामन्यात भिडले पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू, पूर्ण १ षटक चालला विवाद; बघा व्हिडिओ