भारताची युवा कुस्तीपटू अंतिम पंघल हीने 20 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. जॉर्डन येथे सुरू असलेल्या स्पर्धेत तिने 53 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. भारताची आघाडीची महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिला आव्हान दिल्याने अंतिम चर्चेत आली होती.
अंतिमने पहिल्या फेरीत 19 वर्षीय पोलंडच्या निकोला विस्निव्स्काचा 10-0 अशा फरकाने पराभव केला होता. यानंतर उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या झुएझिंग लियांगचा 12-2 असा पाडाव केला. उपांत्य फेरीतही अंतिमचा वरचष्मा होता. तिने तिची प्रतिस्पर्धी पोलिना लुकिनाविरुद्ध 12-0 असा विजय मिळवला. यानंतर तिने अंतिम फेरीत युक्रेनच्या मारिया येफ्रेमोव्हाचा 4-0 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.
अंतिम हिने नुकतीच एशियन गेम्स स्पर्धेसाठी 53 किलो वजनी गटात ट्रायल जिंकली होती. मात्र, विनेश फोगट हिला एशियन गेमसाठी थेट प्रवेश मिळाला होता. परंतु, विनेश दुखापतग्रस्त झाल्याने आता तिच्या जागी अंतिम एशियन गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल.
या स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत 4 सुवर्णपदक, 2 रौप्य पदक व 6 कांस्यपदक जिंकले आहेत.
(Indian Female Wrestler Antim Panghal Won Gold Medal In U20 World Wrestling Championship)
महत्त्वाच्या बातम्या-
विश्वचषकाची संधी हुकल्यानंतर ब्रूकची रिऍक्शन! म्हणाला, ‘स्टोक्स संघात आल्यामुळे मला…’
कारकिर्दीची सुरुवात अप्रतिम करणाऱ्या तिलकच्या नावावर नकोसा विक्रम, ‘या’ यादीत जोडले गेले नाव