Sunil Chhetri Retirement : भारताचा स्टार खेळाडू आणि कर्णधार सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सुनिल छेत्री याची निवृत्ती म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे. भारतीय फुटबॉलवर अधिराज्य गाजवणाऱ्या सुनील छेत्रीने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.
कुवेतविरुद्धच्या फिफा विश्वचषक पात्रता फेरीनंतर तो आंतरराष्ट्रीय फुटबॉलला कायमचा निरोप देणार आहे. हा सामना त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरचा असेल.
सुनील छेत्रीने आज (दि. 16 मे) रोजी कुवेत विरुद्ध फिफा विश्वचषक 2026 च्या पात्रता फेरीनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली. ( Indian football icon Sunil Chhetri announces retirement from sport )
I’d like to say something… pic.twitter.com/xwXbDi95WV
— Sunil Chhetri (@chetrisunil11) May 16, 2024
सुनील छेत्रीच्या निवृत्तीमुळे भारतीय फुटबॉलमध्ये मोठी पोकळी निर्माण होणार, यात दुमत नाही. सुनिल छेत्रीने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने निवृत्तीची घोषणा केली. 39 वर्षीय छेत्रीने 20 वर्षांच्या कारकिर्दीत भारतासाठी 150 सामने खेळले आणि 94 गोल केले.