पॅरिस ऑलिम्पिकला 26 जुलैपासून सुरुवात होत आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू पदक जिंकण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. ऑलिम्पिकमध्ये हॉकी हा भारतासाठी सर्वात यशस्वी खेळ राहिला आहे. भारतीय हॉकी संघानं आतापर्यंत एकूण 12 पदके जिंकली असून त्यापैकी 8 सुवर्ण पदकं आहेत. परंतु तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, एक काळ असा होता की भारतीय फुटबॉल संघ ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचण्याच्या अत्यंत जवळ होता. भारतीय फुटबॉल संघाचं पदक अगदी थोडक्यात हुकलं होतं. हे संपूर्ण प्रकरण काय आहे? हे कधी घडलं होतं? हे सर्वकाही जाणून घेऊया.
1956 चं मेलबर्न ऑलिम्पिक भारतासाठी संस्मरणीय होतं. सर्वप्रथम, भारतीय हॉकी संघानं सुवर्ण पदक जिंकलं. त्यानंतर भारतीय फुटबॉल संघ पदक जिंकण्याच्या उंबरठ्यावर आला होता. मात्र संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. 1956 मध्ये ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय फुटबॉल संघानं चमकदार कामगिरी केली होती. टीम इंडियानं उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाचा 4-2 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली होती. या सामन्यात नेव्हिल डिसूझानं हॅट्ट्रिक करत इतिहास रचला होता. ऑलिम्पिकमध्ये हॅट्ट्रिक करणारा तो पहिला आशियाई खेळाडू होता.
डिसूझाची चमकदार कामगिरी उपांत्य फेरीतही कायम राहिली. परंतु संघाला युगोस्लाव्हियाविरुद्ध 4-1 असा पराभव पत्करावा लागला. कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यातही भारताला निराशेचा सामना करावा लागला आणि बल्गेरियाविरुद्ध 0-3 असा पराभव स्वीकारावा लागला.
मेलबर्न ऑलिम्पिक 1956 मधील भारतीय फुटबॉल संघ
अब्दुल रहमान, नेव्हिल डिसूझा, कृष्ण स्वामी किट्टू, तुलसीदास बलराम, निखिल कुमार नंदी, सय्यद ख्वाजा अजीज-उद-दीन, पीटर रामास्वामी थांगराज, मुहम्मद नूर, समर बॅनर्जी, मरियप्पा केम्पिया, सुब्रमण्यम शंकर नारायण, मुहम्मद सलाम, अब्दुल शेख लतीफ, हुसेन अहमद, मुहम्मद कन्नयन, प्रदीप कुमार बॅनर्जी, मोहम्मद झुल्फिकारउद्दीन, कृष्ण चंद्र पाल
महत्त्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषक 2026 मध्ये विराट आणि रोहितची जागा कोण घेणार? माजी क्रिकेटपटूने सांगितली 4 नावे
“रोहित माझ्याविरुद्ध फलंदाजीला घाबरतो, विराट आऊट झाल्यावर चिडतो”; दिग्गज गोलंदाजानं घेतली मजा
नताशाला घटस्फोट दिल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच हार्दिक पांड्या आणि ‘ही’ अभिनेत्री इन्स्टावर बनले फ्रेंड