---Advertisement---

PHOTO। ‘FIH प्रो लीग’च्या सामन्यासाठी भारतीय पुरुष आणि महिला संघ बेल्जियमला रवाना

India-Hockey-Mens-And-Womens
---Advertisement---

भारतीय महिला व पुरुष हॉकी संघ ११ आणि १२ जून रोजी बेल्जियम विरुद्ध होणाऱ्या एफआयएच हॉकी प्रो लीग सामन्यांसाठी बुधवारी (८जून) रोजी ब्रुसेल्सला रवाना झाले. दोन्ही भारतीय संघ ११ आणि १२ जून रोजी यजमान बेल्जियमविरुद्ध दोन सामने खेळणार आहेत.

भारताच्या महिला संघाची कर्णधार सविता हिने रवाना होण्यापूर्वी सांगितले की, “आम्ही या दौऱ्याबद्दल नक्कीच उत्साहित आहोत कारण आम्हाला एफआयएच हॉकी प्रो लीग सामन्यांमध्ये युरोपमधील काही अव्वल संघांविरुद्ध खेळण्याची उत्तम संधी मिळत आहे.” सोबतच भारतीय पुरुष संघाचा कर्णधार अमित रोहिदास म्हणाला की, “जगातील काही आघाडीच्या संघांविरुद्ध त्यांच्या मैदानावर खेळताना आम्हाला आनंद होत आहे.”

भारतीय महिला संघ सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. एफआयएच प्रो लीग टेबलमध्ये आठ सामन्यांतून २२ गुण आहेत. ते गउणतालिकेत अर्जेंटिना (३८ गुण) आणि नेदरलँड्स (२६ गुण) यांच्या मागे आहे. महिला संघाने आत्तापर्यंत या स्पर्धेत ८ सामने खेळले आहेत ज्यापैकी ४ सामन्यांत संघाने विजय मिळवला आहे.

भारतीय पुरुष संघ सध्या एफआयएच प्रो लीग टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. ते गुणतालिकेत अव्वल असणाऱ्या नेदरलँडपेक्षा केवळ तीन गुणांनी मागे आहेत. हॉकी इंडियाच्या प्रसिद्धीनुसार, पुरुष संघाने या स्पर्धेत आत्तापर्यंत एकुण १२ सामने खेळले आहेत. ज्यापैकी ८ सामन्यांमध्ये भारतीय सँघाने विजय मिळावला आहे.

व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

“Hockey World Cupमध्ये भारतीय टीमला श्रीजेशसारख्या गोलकीपरची गरज”

भारीच ना! आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताने काढला जपानचा वचपा, २-१ने घेतला मागच्या पराभवाचा बदला

अरेरे! अखेरच्या क्षणी भारताने पाकिस्तानविरुद्ध गमावली विजयाची संधी, आशिया कप सामन्यात बरोबरी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---