ओमानमधील सालालाह येथे सुरू असलेल्या ज्यूनियर आशिया चषक हॉकी स्पर्धेमध्ये भारतीय संघाकडून दमदार खेळी पाहायला मिळत आहे. ज्युनियर आशिया चषक हॉकी 2023चा अंतिम सामना गुरुवारी (दि. 1 जून) खेळला जाणार आहे. अंतिम सामना जर भारताने आपल्या नावावर केला, तर भारत हा सर्वाधिक वेळा विजय मिळवणारा देश ठरेल. या सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान आमने-सामने येणार असून दोन्ही संघाकडे प्रत्येकी तीन जेतेपद आहेत.
भारतीय हॉकी संघाने या स्पर्धेच्या एकतर्फी सामन्यात दक्षिण कोरियाचा 9-1 असा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. आज भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) असा सामना पहायला मिळणार आहे. दरम्यान, मलेशियाचा 6-2 असा पराभव करत पाकिस्तानने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात देखील भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. उभय संघातील हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 9.30 वाजता खेळवला जाईल.
संघाचे घवघवीत यश, अंतिम सामना रंगणार जोरदार
बुधवारी (दि. 31 मे) झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाच्या विजयाचे श्रेय धामी बॉबी सिंगला जाते. जबरदस्त खेळीमुळे त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून निवडण्यात आले. धामीने 31, 39, आणि 55 व्या मिनिटाला गोल केला, तर लाकरा सुनीतने 13व्या मिनिटाला गोल करत भारताचे खाते उघडले. सामन्याच्या 19व्या मिनिटानंतर अरिजित सिंगने खेळाचा वेग वाढवला. अंगद वीर सिंह आणि उत्तम सिंहने जोरदार खेळी खेळत 34 आणि 38व्या मिनिटाला गोल केला.
भारतीय संघाने केले 48 गोल
उत्तम सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हॉकी स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. भारताने गटातील चार सामने खेळले असून, त्यातील तीन सामन्यांमध्ये यश संपादन केले आहे. भारताच्या गृपमध्ये पाकिस्तान, थायलंड, जपान आणि चीन, तैपेई या संघाचा समावेश होता. भारताने गट सामन्यांमध्ये 39 गोल केले, तर त्यांच्याविरुद्ध केवळ दोन गोल करण्यात आले. एकूणच, भारताने या स्पर्धेमध्ये 48 गोल केले असून, भारताविरुद्ध फक्त 3 गोल करण्यात विरोधी संघांना यश आले आहे.
भारताला इतिहास रचण्याची संधी
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये रंगणारा हा आजचा अंतिम सामना भारताने आपल्या नावावर केला तर, अनेकवेळा विजय मिळवणाऱ्या यादीत भारताचे नाव लिहिले जाईल. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघाकडे तीन जेतेपद आहेत. ज्यूनियर आशिया चषक तब्बल आठ वर्षांनंतर आयोजित करण्यात येत आहे. मलेशियामध्ये 2015 मध्ये शेवटच्या वेळी ही स्पर्धा खेळली गेली होती. (indian hockey teams final match against pakistan in junior asia cup hockey)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
IPL फायनलमधील धोनीचा ‘हा’ भावूक करणारा व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील, जोरदार होतोय व्हायरल
WTC फायनलपूर्वीच कांगारुंना वाटतेय विराट-पुजाराची भीती! चेतावणी देत पाँटिंग म्हणाला, ‘लवकर विकेट…’