---Advertisement---

सामना झाला नाही पण भारतीय जुगाडाची झाली सगळीकडेच चर्चा

On: सोमवार, जानेवारी 6, 2020 1:54 PM
---Advertisement---

गुवाहाटी। भारत विरुद्ध श्रीलंका संघातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना बारसपारा स्टेडियम, गुवाहाटी येथे रविवारी(5 जानेवारी) होणार होता. मात्र या खेळपट्टीत ओलावा असल्याने सामना रद्द करण्यात आला.

या सामन्याआधी गुवाहाटीमध्ये जवळपास तासभर पाऊस पडला होता. मात्र काही रिपोर्ट्सच्या मते कव्हर्स फाटलेले असल्याने ते खेळपट्टीवरुन हटवताना पाणी खेळपट्टीवर पसरले. त्यामुळे ग्राउंड स्टाफने खेळपट्टी सुकवण्यासाठी 2 तास काम केले.

खेळपट्टी सुकवण्यासाठी सुपर सॉपरबरोबरच इस्त्री आणि हेअरड्रायरही वापरण्यात आले. त्यामुळे सध्या बीसीसीआयवर टीका होत आहे. चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले आहे.

खेळपट्टी इस्त्री आणि हेअर ड्रायरने सुकवतानाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. काही सोशल मीडिया युजर्सने म्हटले आहे की बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे, पण खेळपट्टी सुकवण्यासाठी चांगल्या सुविधा नाही.

तर काहींनी म्हटले आहे की मैदान झाकण्यासाठी चांगले कव्हर्सही नाहीत. अशा पद्धतीने सोशल मीडियावर बीसीसीआयला ट्रोल करण्यात येत आहे.

https://twitter.com/BorkarParish/status/1214093984311545861

https://twitter.com/marshal63259391/status/1214030473493483520

या सामन्यासाठी खेळपट्टी सुकवताना एवढे प्रयत्न करुनही अखेर खेळपट्टी पूर्णपणे सुकवण्यात अपयश आल्याने अखेर सामना रात्री 9.55 वाजताच्या दरम्यान रद्द करण्यात आला.

आता भारत विरुद्ध श्रीलंका संघातील दुसरा टी20 सामना 7 जानेवारीला इंदोर येथे होणार आहे.

असे केले चाहत्यांनी बीसीसीआयला सोशल मीडियावर ट्रोल – 

https://twitter.com/GyanuAbhi/status/1213889493549191168

https://twitter.com/AsadAli512/status/1214039669584924674

https://twitter.com/NationFirst_1st/status/1214093660075089921

https://twitter.com/1sInto2s/status/1213859305947926528

https://twitter.com/Nahid_CSKian/status/1213879562414759937

https://twitter.com/GyanuAbhi/status/1213889493549191168

https://twitter.com/nowwwin/status/1213848836948381696

https://twitter.com/TridibIANS/status/1213848134637326341

https://twitter.com/PrantanuKataki/status/1214026194397483010

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---