---Advertisement---

डीसीचा 1 धावेच्या पराभवानंतर भारतीय दिग्गजाने केला डेविड मिलरचा बचाव! म्हणाले, “यात त्याची काहीही चूक…”

On: गुरूवार, एप्रिल 9, 2026 2:23 PM
---Advertisement---

आयपीएल २०२६ मध्ये चाहत्यांना बुधवारी (८ एप्रिल) एक थरारक सामना अनुभवायला मिळाला. हा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरातने शेवटच्या चेंडूवर एका धावेने रोमांचक विजय मिळवला. दिल्लीच्या या पराभवाला जबाबदार डेविड मिलर याला ठरवले जात असताना भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी त्याचा बचाव केला आहे.

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात दिल्लीला विजयासाठी दोन चेंडूत दोन धावांची आवश्यकता होती. तेव्हा मिलरचा एकेरी धाव न घेण्याता घेतलेला निर्णय सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. ते षटक वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा टाकत होता. तेव्हा मिलरने सामना उत्तम संपवण्याचा आत्मविश्वास दाखवला, मात्र त्याचा प्रयत्न चुकला. अतिरिक्त धाव मिळवण्याच्या प्रयत्नात जोस बटलरच्या अचूक थ्रोमुळे कुलदीप यादव धावबाद झाला आणि डीसीने सामना गमावला.

सामन्यानंतर गावसकर जियोस्टारवर म्हणाले, “डेविड मिलरला स्वत:वर विश्वास होता. तो चेंडूवर चांगला फटका खेळून सामना संपवू शकतो, असे त्याला वाटले. त्याच्या या विश्वासाला दोष देऊ शकत नाही. शेवटी हे सर्व कसे अंमलात आणले जाऊ शकते, यावर अवलंबून असते. प्रसिद्ध कृष्णाने अप्रतिम स्लोअर बाउन्सर टाकला आणि सर्व कठिण झाले. दबावाच्यावेळी अशा गोष्टींचा पार कमी फरकाने फायदा होतो.”

गावसकर यांनी मिलरला पाठिंबा दर्शवत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या १९८६ च्या कसोटी सामन्याची आठवण करुन दिली. ते म्हणाले, “अशावेळी खेळाविषयीची जागरुकता महत्वाची ठरते. १९८६ मध्ये रवी शास्त्रींनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकेरी धाव घेऊन सामना बरोबरीत केला होता. एक धाव घेणे हा पर्याय अधिक चांगला आहे. ते पण कुलदीप यादवने एकेरी धाव घेतल्यानंतर तर ते अधिक महत्वाचे.”

या सामन्यात गुजरातने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली होती. कर्णधार शुबमन गिल, जोस बटलर आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर गुजरातने २० षटकात ४ विकेट्स गमावत २१० धावा केल्या होत्या. दिल्लीकडून मुकेश कुमार याने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या होत्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीकडून केएल राहुलने केलेली ५२ चेंडूत ९२ धावांची खेळी केली. तसेच गुजरातकडून राशिद खानने प्रभावी गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात १७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. हा सामना दिल्लीने एका धावेने गमावला. मिलर २० चेंडूत ४१ धावा करत नाबाद राहिला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---