भारताचे दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) हे जगातील महान कसोटी फलंदाजांपैकी एक आहेत. या 2 दिग्गजांनी असे अनेक रेकाॅर्ड केले जे आजपर्यंत मोडणे कोणत्याही फलंदाजासाठी शक्य झाले नाही. मात्र, या दिग्गजांच्या नावावर एक असा लाजिरवाणा रेकाॅर्ड आहे, जो कोणताही फलंदाज स्वप्नातही मोडीत काढण्याचा विचार करणार नाही.
वास्तविक, राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा बाद होणारे अनुक्रमे पहिले, दुसरे फलंदाज आहेत. द्रविड हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा बोल्ड होणारा फलंदाज आहे. 164 कसोटी सामन्यांमध्ये तो 55 वेळा बोल्ड होऊन तंबूत परतला. तर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) त्याच्या 200 कसोटी सामन्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत 54 वेळा बोल्ड होऊन तंबूत परतला आहे. हा एक असा रेकाॅर्ड आहे. जो कोणत्याही फलंदाजाला मोडीत काढायला आवडणार नाही.
कसोटीत सर्वाधिक वेळा बोल्ड होणारे टॉप-5 फलंदाज
राहुल द्रविड– 55
सचिन तेंडुलकर- 54
ॲलन बॉर्डर- 53
जॅक कॅलिस- 46
जॉन रीड- 43
महत्त्वाच्या बातम्या-
आश्चर्यकारक! IND vs NZ; कसोटी सामन्यात ‘या’ खेळाडूने ठोकलेत सर्वाधिक षटकार!
IND vs BAN; शानदार विजयानंतर प्रशिक्षकाची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…
बाबरची तुलना कोहलीशी करणं माजी खेळाडूला पडलं महागात! चाहत्यांनी केलं प्रचंड ट्रोल