मागील वर्षी टोकियो ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकलेल्या भारतीय पुरूष हॉकी संघाने बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्स २०२२ च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. .मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा ३-२ असा पराभव करत अंतिम सामन्यातील आपली जागा नक्की केली. अशाप्रकारे भारतीय संघ २०१४ नंतर प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला आहे.
Just what the #MenInBlue wanted! 😍Looking forward to the finals 🏑
IND 3:2 RSA #HockeyIndia #IndiaKaGame #B2022 #Birmingham2022 @CMO_Odisha @IndiaSports @Media_SAI @sports_odisha pic.twitter.com/fpuYKPy0iM
— Hockey India (@TheHockeyIndia) August 6, 2022
क्रमवारीत भारतापेक्षा खूपच खाली असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने यावेळी उपांत्य फेरी गाठून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. अशा स्थितीत भारतीय संघला या उपांत्य सामन्यात कडवी टक्कर मिळण्याची अपेक्षा होती. भारतीय संघाला आपले खाते उघडण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रत्येक वेळी पिछाडीवर पडूनही शेवटपर्यंत हार मानली नाही आणि अखेरच्या मिनिटातही गोल करत भारताकडून विजय हिसकावण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला.
पहिल्या गोलसाठी संघाला २० मिनिटे वाट पाहावी लागली. अखेर दुसऱ्या क्वार्टरमध्ये अभिषेकने भारताचे खाते उघडले. त्यानंतर याच क्वार्टरमध्ये २८ व्या मिनिटाला कर्णधार मनप्रीतने भारताची आघाडी वाढवली. तिसरा क्वार्टर सुरू होताच दक्षिण आफ्रिकेसाठी ३३ व्या मिनिटाला रायनने गोल करत दक्षिण आफ्रिकेची पिछाडी एकने भरून काढली.
यानंतर दोन्ही संघांमध्ये चांगलाच संघर्ष रंगला. शेवटी बरोबरी साधण्याच्या प्रयत्नात दक्षिण आफ्रिकेने गोलकीपरच्या जागी दुसरा खेळाडू आणला आणि त्यामुळे नुकसान झाले. जुगराज सिंगने ५८व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे रुपांतर गोलमध्ये करून भारताचा विजय निश्चित केला. मात्र, १ मिनिटानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसरा गोल मारला. परंतु, तोपर्यंत उशीर झाला.
भारतीय संघ आता सुवर्णपदकासाठी ऑस्ट्रेलियाशी खेळेल. असल्याने यजमान इंग्लंडचा पराभव करत अंतिम फेरीत जागा मिळवली.
महत्त्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडीज मोहिमही फत्ते! दणदणीत विजयासह टी२० मालिकाही टीम इंडियाच्या नावे
CWG BREAKING: कुस्तीत भारताचा ‘सुवर्ण’ षटकार; १९ वर्षाच्या नवीनने जिंकले गोल्ड
‘हिटमॅन’ बनला सोळा हजारी मनसबदार! दिग्गजांच्या यादीत वादळी खेळीसह पदार्पण