चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा चौथा सामना शनिवारी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघात खेळला गेला. हा सामना लाहोर येथील गद्दाफी स्टेडियमवरती खेळला गेला. स्टेडियमवरती सामन्याला सुरुवात झालीच न्हवती, तेवढ्यात भारताचे राष्ट्रगीत सुरू झाले. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन्ही संघ मैदानावरती आल्यानंतर त्या दोन्ही देशांचे राष्ट्रगीत वाजणे गरजेचे होते. पण आयोजकांकडून चुकून भारताचे राष्ट्रगीत वाजविण्यात आले. हा व्हिडिओ सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर या घटनेमुळे पाकिस्तानविषयी खूप चर्चा होत आहे. ही घटना खूपच धक्कादायक आहे कारण टीम इंडियाने पाकिस्तानमध्ये एकही सामना खेळलेला नाही. हायब्रिड मॉडेलमुळे भारत दुबईमध्ये आपले सामने खेळत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये, पार्श्वभूमीत आवाज येत आहे, ‘भारत भाग्य व्ही.’ परंतु, हे विधान पूर्ण होण्याच्या आधीच भारताचे राष्ट्रगीत थांबविण्यात आले.
पाकिस्तानला त्यांच्या स्पर्धेच्या व्यवस्थेबद्दल ट्रोल करण्याची ही पहिलीच वेळ नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कराचीतील मैदानावर भारतीय ध्वज फडकविण्यात आला नसल्याने मोठे प्रश्न उपस्थित झाले होते. बोर्डाचे अधिकारी वारंवार जागतिक दर्जाच्या व्यवस्थेचा दावा करताना दिसले असल्याने या घटनेबद्दल पीसीबीवर जोरदार टीका झाली.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामन्यात भारतीय राष्ट्रगीत वाजवण्याबाबत, पाकिस्तानी लोक स्वतःही आयोजकांवर हल्ला करत आहेत. एका चाहत्याने लिहिले की तुम्हाला राष्ट्रगीत वाजविण्यासाठी नोकरी मिळाली, पण तेही तुम्हाला व्यवस्थित जमले नाही. त्याच वेळी दुसरीकडे, पाकिस्तानच्या मैदानावरती भारतीय राष्ट्रगीत वाजल्याने काही लोकांनी जयजयकार केला.
महत्वाच्या बातम्या :
पाकिस्तान सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका ? विराट कोहलीला सरावादरम्यान दुखापत
माजी दिग्गजाने विराट कोहलीच्या फाॅर्मविषयी व्यक्त केली चिंता! म्हणाला…
भारत विरुद्ध पाकिस्तान: शेवटच्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात कोण चमकले, कोण झाले नामोहरम?