भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने नुकतेच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीबरोबर इंस्टाग्राम लाईव्हमार्फत चर्चा केली. यामध्ये त्याने सांगितले की, लॉकडाऊननंतर फलंदाजांना मैदानावर पुनरागमन करणे कठीण असेल.
रोहित पुढे म्हणाला की, फलंदाजांना आपल्या फॉर्ममध्ये येण्यासाठी कमीत कमी दीड महिना लागू शकतो. फलंदाजीची पकड आणि डोळ्यांचे योग्य समन्वय साधणे ही फलंदाजीमधील महत्त्वाची गोष्ट असते. अशामध्ये फलंदाजांना वेगवान चेंडूबरोबर ताळमेळ बसवण्यात वेळ लागतो.
सलामीवीर फलंदाज रोहित शमीबरोबर (Mohammed Shami) बोलताना म्हणाला की, “गोलंदाजांच्या तुलनेत फलंदाजांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणे आव्हानात्मक असेल. कारण फलंदाजांना सराव करण्यासाठी अधिक वेळ लागेल. त्यांना ३ महिन्यांपेक्षा अधिक काळ मैदानापासून दूर रहावे लागले आहे. यादरम्यान त्यांनी बॅटला हातदेखील लावलेला नाही. अशामध्ये पुन्हा फॉर्ममध्ये येण्यासाठी फलंदाजांना कठीण होईल.”
वेगवान गोलंदाज असूनही शमी रोहितशी (Rohit Sharma) सहमत असल्याचे दिसला. शमी म्हणाला की, “लॉकडाऊन (Lockdown) असूनही वेगवान गोलंदाज वर्कआऊटवर लक्ष देत आहेत. ते ट्रे़डमिलवर धावत आहेत. यामुळे आम्हाला पायांना मजबूत करण्यास मदत होईल. कोरोना व्हायरसनंतर परिस्थितीत सुधारणा झाली तर आम्हाला केवळ गोलंदाजी करताना मनगटाच्या योग्य जागेवरच काम करावे लागेल. यासाठी जवळपास १० ते १५ दिवस लागतील.
शमी पुढे म्हणाला की, “लॉकडाऊनंतर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमनापूर्वी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी म्हणजेच एनसीएमध्ये एक महिन्यांचा ट्रेनिंग कँप असायला पाहिजे. याबद्दल मी आशिष नेहरासोबतही चर्चा केली आहे की, जसे लॉकडाऊन संपेल तेव्हा आपण एनसीएमध्ये ट्रेनिंग कँप सुरु केले पाहिजे. यामुळे आम्हाला लय मिळवण्यात मदत होईल. तसेच हेदेखील समजेल की, कोणताही गोलंदाज जखमी तर नाही.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-विराट आयपीएलमधील आजपर्यंतचा सर्वात युवा कर्णधार, नावावर आहे धोनीपेक्षा खास विक्रम
-एबी, फिंच या परदेशी खेळाडूंशिवाय बेंगलोरची टीम अशी होईल राॅयल
-रवी शास्त्री अडकले अलिबागमध्ये, आता घेणार बीअरचा आनंद