चेन्नई : मानव ठक्करने अनुभवी अचंता शरथ कमलविरुद्ध थरारक विजय मिळविल्याने इंडियन ऑइल अल्टिमेट टेबलटेनिस (यूटीटी) 2024 लीगच्या रोमांचक लढतीत यू मुंबा टीटीने चेन्नई लायन्सचा 8-7 असा पराभव केला.
चेन्नईतील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या लीगमध्ये शुक्रवारी विजय मिळवताना यू मुंबा टीटीने गुणतालिकेत 29 गुणांसह दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. चेन्नई लायन्सचे 19 गुण आहेत.
भारतीय टेबल टेनिस फेडरेशनच्या (टीटीएफआय) संयुक्त विद्यमाने नीरज बजाज आणि विटा दाणी यांनी फ्रँचायझी आधारित लीगचा प्रचार केला आहे.
तरूणाई आणि अनुभव यांच्यातील संघर्षात प्रतिभावान ठक्करने खराब सुरुवातीनंतर शानदार पुनरागमन करताना शरथ कमलवर 6-11, 11-8, 11-9 असा विजय मिळवला. या विजयासह त्याने या मोसमात आपला सर्व विजय (ऑल विन) विक्रम कायम ठेवला.
मिश्र दुहेरीच्या लढतीत ठक्करने स्पॅनिश स्टार मारिया जिओसोबत शरथ आणि साकुरा मोरी या चेन्नई लायन्स जोडीवर ११-७, ११-१०, ११-४ अशी मात केली.
यू मुंबा टीटी आघाडीवर असताना सुपर मॉम मौमा दासने टायच्या शेवटच्या सामन्यात महिला एकेरीत मारिया जिओला 2-1 असे हरवत चेन्नईला पहिला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, नायजेरियाची स्टार खेळाडू अरुणा क्वाद्रीने यू मुंबा टीटीला 10-11, 11-9, 11-7 ने ज्युल्स रोलँडवर विजय मिळवून आश्वासक सुरुवात केली.
तथापि, मोरी हिने महिला एकेरीत सुतीर्थ मुखर्जीचा पराभव करून यू मुम्बा टीटीला बरोबरी साधण्यास मदत केली आणि एक रोमांचक समाप्तीसाठी बरोबरी निश्चित केली.
इंडियन ऑइल यूटीटी 2024 चे थेट प्रक्षेपण Sports18 Khel चॅनेलवर आणि JioCinema (भारत) आणि Facebook Live dware (भारताबाहेर) ऑनलाइन माध्यमांवर केले जाईल. लीगची तिकिटे BookMyShow वर ऑनलाइन आणि चेन्नईतील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममधील गेट नं. १ जवळ ऑफलाइन उपलब्ध आहेत. ही लीग पुढील १७ दिवस चालेल आणि ७ सप्टेंबर रोजी अंतिम सामना होईल.
निकाल :
यू मुंबा टीटी वि. वि. चेन्नई लायन्स ८-७:
अरुणा क्वाद्ररी वि. वि. ज्युलेस रोलँड २-१ ( १०-११, ११-९, ११-७); सुतिर्था मुखर्जी पराभूत वि. सकुरा मोरी ०-३ ( ८-११, १०-११, ७-११); मारिआ झिओ/मानव ठक्कर वि. वि. सकुरा मोरी/शतथ कमल ३-० ( ११-७, ११-१०, ११-४); मानव ठक्कर वि. वि. अचंता शरथ कमल २-१ ( ६-११, ११-८, ११-९); मारिआ झिओ पराभूत वि. मौमा दास १-२ ( १०-११, ८-११, ११-१०).