---Advertisement---

दुसऱ्या वनडे आधीच टीम इंडियाचा सलामीवीर झाला जायबंदी; इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत म्हणाला…

On: शुक्रवार, ऑगस्ट 19, 2022 6:58 PM
Shubman Gill & Shikhar Dhawan
---Advertisement---

झिम्बाब्वे आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला गुरूवारी (१८ ऑगस्ट) सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने यजमान संघावर दहा गडी राखून दणदणीत विजय मिळवत १-० अशी आघाडी घेतली. १९० धावांचा पाठलाग करताना शिखर धवन व शुबमन गिल यांनी नाबाद अर्धशतके ठोकत संघाला विजय मिळवून दिला. आपल्या याच अर्धशतकी खेळीदरम्यान संघाचा उपकर्णधार शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्याचे वृत्त समोर येत आहे. ‌‌‌‌‌

पहिल्या वनडेदरम्यान शिखरने ब्रॅड इव्हान्सच्या चेंडूवर फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटला बॉलचा स्पर्श न झाल्याने त्याच्या हाताला दुखापत झाली. शिखरने त्याच्या इंस्टाग्रामवर त्याच्या दुखापतीचा एक फोटो पोस्ट केला आहे आणि लिहिले आहे की तुम्हाला असा ‘बॉल लव्ह बाइट’ हवा आहे. धवनने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या हाताला थोडी सूज आल्याचे दिसत आहे. मात्र, ही दुखापत अजिबात गंभीर नसल्याचे समजत आहे.

https://instagram.com/stories/shikhardofficial/2907605932385249833?utm_source=ig_story_item_share&igshid=MDJmNzVkMjY=

झिम्बाब्वेने दिलेल्या १९० धावांचा पाठलाग करताना अनुभवी सलामीवीर शिखर धवनने जबाबदारी घेतली. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत ११३ चेंडूंमध्ये ९ चौकारांच्या मदतीने ८१ धावांची खेळी केली. विजयी फटका त्याच्याच बॅटमधून आला.

या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास भारतीय कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तब्बल सहा महिन्यानंतर पुनरागमन करत असलेल्या दीपक चहर, अक्षर पटेल व प्रसिद्ध कृष्णा त्यांनी प्रत्येकी तीन बळी घेत मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. इवान्स व नवागारा यांनी नवव्या गड्यासाठी ५६ धावा जोडून संघाला १८९ पर्यंत नेले. प्रत्युत्तर धवन व गिल यांना बाद करू शकणारा चेंडू झिम्बाब्वेचा एकही गोलंदाज टाकू शकला नाही. अखेरीस भारताने ३०.५ षटकात विजय साकारला. दीपक चहर याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या-

केरळचा इंजिनीयर बनला युएईचा कॅप्टन! आता भारताशीच करणार दोन हात

‘भारताचा इतिहास, पण आशिया चषक पाकिस्तानच जिंकणार!’ माजी कर्णधाराने दिलं संदर्भासहित स्पष्टीकरण

फलंदाजांना गुडघे टेकायला लावणारा अख्तर वापरतोय ‘कुबड्या’, वाचा कशामुळे आली ही वेळ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---