शुक्रवारी (15 सप्टेंबर) भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्याकडे मोठा विक्रम करण्याची संधी होती. मात्र, बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात रोहित शुन्यावर बाद झाला आणि माजी दिग्गजाचा हा विक्रम देखील अबाधित राहिला. रोहितसह सलामीला आलेला तिलक वर्मा यालाही मोठी खेळी करता आली नाही.
रोहित शर्मा () याच्या नेतृत्वात तिलक वर्मा याने शुक्रवारी (15 सप्टेंबर) बांगलादेशविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, त्याला पदार्पणाच्या सामन्यात अवघ्या 4 धावांवर समाधान मानावे लागले. त्याने यासाठी 9 चेंडू खेळले. तंजीम हसन साकिब याने तिलकला डावातील तिसऱ्या षटकात क्लीन बोल्ड केले. तत्पूर्वी कर्णधार रोहित शर्मा याने 2 चेंडू खेळून तंजीमलाच विकेट दिली होती. रोहितने डावातील दुसऱ्याच चेंडूत अनमूल हक याच्या हातात झेल दिला.
दरम्यान, रोहित या सामन्यात वनडे आशिया चषकात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनू शकत होता. यासाठी त्याला अजून 33 धावा हव्या होत्या. रोहितने जर 33 धावांची खेळी केली असती, तर भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा विक्रम मोडीत निघाला असता. सचिन तेंडुलकरने वनडे आशिया चषकात भारतासाठी सर्वाधिक 971 धावा केल्या आहेत.
उभय संघांतील या सामन्याचा एकंतरीत विचार केला, तर बांगलादेश संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांमध्ये 8 बाद 265 धावा केल्या. शाकिब अल हसन याने 80, तर तौहीत ह्रदोय याने 54 धावांची खेळी केली. भारतासाठी शार्दुल ठाकूर याने 3, तर मोहम्मद शमी याने 2 विकेट्स घेतल्या आहेत. प्रत्युत्तरात भारताची सलामीवीर जोडी संघाची धावसंख्या अवघी 17 असताना तंबूत परतली. (Indian openers Rohit Sharma and Tilak Verma were dismissed cheaply in front Tanzim Hasan Sakib)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा.
बांगलादेश – लिटन दास (यष्टीरक्षक), तंजीद हसन, अनमूल हक, शाकिब अल हसन (कर्णधार), तौहीद ह्रदोय, शमीम हुसेन, मेहिदी हसन मिराझ, महेदी हसन, नसुम अहमद, तंजीम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान.
महत्वाच्या बातम्या –
Asia Cup । फायनलसाठी विराट खूपच उत्सुक! बांगलादेशविरुद्ध सामना सुरू असताना गेला प्रॅक्टिसला
जडेजाने टाकले कपिल देवच्या पावलावर पाऊल! बनला अशी कामगिरी करणारा केवळ दुसरा भारतीय