वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना बार्बाडोस येथे खेळला गेला. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत भारतीय संघाने आधीच मालिका खिशात घातलेली. या सामन्यात भारताचे सलामीवीर कर्णधार शिखर धवन व शुबमन गिल यांनी पुन्हा एकदा संघाला मजबूत सुरुवात दिली. या जोडीने मालिकेत दुसऱ्यांदा शतकी सलामी दिली. यासह पोर्ट ऑफ स्पेनमधील भारतीय संघाच्या सलामीच्या यशाची परंपरा कायम ठेवली.
धवन-गिलने पुन्हा एकदा दिली शतकी सलामी
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत या मालिकेसाठी कर्णधारपदाची जबाबदारी शिखर धवनच्या खांद्यावर दिली गेली होती. त्याने ही जबाबदारीने शानदार खेळ केला. तसेच जवळपास दीड वर्षाच्या कालावधीनंतर वनडे संघात पुनरागमन करत असलेल्या शुबमन गिलनेही कामगिरीत सातत्य ठेवत सर्वांची मने जिंकली. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात या दोघांनी भारतीय संघाला ११३ धावांची सलामी दिली. दोघांनीही यादरम्यान मालिकेतील आपले प्रत्येकी दुसरे अर्धशतक साजरे केले. भारतीय संघाची तीन सामन्यांच्या मालिकेतील ही दुसरी शतकी सलामी भागीदारी ठरली.
पोर्ट ऑफ स्पेनमधील मागच्या दहा वर्षातील कामगिरी
पोर्ट ऑफ स्पेन येथील हे क्वीन्स पार्क ओव्हल मैदान भारतीय सलामीवीरांसाठी मागील दहा वर्षात कमालीचे लाभदायी ठरले आहे. येथे मागील दहा वर्षात वेस्ट इंडिजविरूद्ध खेळलेल्या ८ वनडे सामन्यात भारतीय सलामीवीरांचा दबदबा राहिला आहे. २०१३ मध्ये तिरंगी मालिकेतील सामन्यात रोहित शर्मा व शिखर धवन या जोडीने १२३ धावांची सलामी दिलेली. त्यानंतर २०१७ च्या दौऱ्यावर याच ठिकाणी खेळलेल्या दोन वनडेत शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे या सलामीवीरांनी अनुक्रमे १३२ व ११४ धावांची दमदार सुरुवात भारतीय संघाला करून दिली होती. २०१९ मध्ये मात्र धवन-रोहित जोडीला अपयश आलेले. या दौऱ्यातील दोन सामन्यात ही जोडी फक्त २ व २५ धावाच काढून देण्यात यशस्वी झालेली.
त्यानंतर आता धवन व गिल यांनी तीन सामन्यात अनुक्रमे ११९, ४८ व ११३ धावांच्या शानदार सलामी देत भारताची या मैदानावरील सलामीच्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडिया जिंकतेय खरी; पण या कमजोरीवर जाईना कोणाचेच लक्ष
आता सगळ्यांना तोंड फुटलंय! विराटवर टीका करणाऱ्यावंर सीएसकेचा खेळाडू भडकला
टी२०त हीट, तर वनडेत फ्लॉप! टीम इंडियाचे टेंशन वाढवतोय ‘हा’ खेळाडू