इंडियन प्रीमिअर लीग 2023 हंगामात स्टम्प्सचे दोन भाग करणारा भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग इंग्लंडमध्ये धमाल करतोय. अर्शदीपने काऊंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत आपल्या वेगाच्या जोरावर खाते उघडले आहे. त्याने शानदार चेंडू फेकत सरे संघाचा फलंदाज बेन फोक्स याला तंबूचा रस्ता दाखवला आहे. अर्शदीपचा यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
इंग्लंडमध्ये अर्शदीपचा जलवा
काऊंटी चॅम्पियनशिप (County Championship) स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात केंट (Kent) संघाकडून खेळताना अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याने कहर केला. त्याने आपल्या स्विंग चेंडूने फलंदाजाच्या नाकी नऊ आणल्या. स्पर्धेत भारतीय वेगवान गोलंदाजाची पहिली शिकार बेन फोक्स (Ben Foaks) बनला. अर्शदीपचा वेगवान चेंडू फोक्सला समजलाच नाही आणि चेंडू वेगाने त्याच्या पॅडवर जाऊन लागला. यावेळी अर्शदीप आणि केंट संघाच्या इतर खेळाडूंनी जोरात अपील केली, यानंतर पंचांनीही बोट वर करत फलंदाजाला बाद घोषित केले.
अर्शदीपचा जल्लोष
स्पर्धेतील आपली पहिली विकेट घेण्याचा आनंद अर्शदीपच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकला. अर्शदीपने फोक्सला बाद केल्यानंतर जोरदार जल्लोष केला. त्याने स्टम्प्सजवळ जाऊन हवेत पंच मारला आणि आपला आनंद व्यक्त केला. अर्शदीपच्या या सेलिब्रेशनमध्ये केंट संघाचे इतर खेळाडूही सामील झाले.
Arshdeep Singh has his first #LVCountyChamp wicket!
The @KentCricket bowler gets one to nip back and dismisses Ben Foakes pic.twitter.com/RS4TTfAjut
— LV= Insurance County Championship (@CountyChamp) June 12, 2023
सरे संघाची खराब स्थिती
अर्शदीपने घेतलेल्या विकेटमुळे सरे (Surrey) संघाचा डाव वाईटरीत्या ढासळला. संघाने अवघ्या 42 धावांवर आपल्या 5 विकेट्स गमावल्या. त्यांनी पहिल्या डावात सर्वबाद 145 धावाच केल्या. तत्पूर्वी केंट संघाने प्रथम फलंदाजी करताना 82.2 षटकात 301 धावा चोपल्या होत्या. केंटकडून जॉर्डन कॉक्स चमकला. त्याने 198 चेंडूत 133 धावांची खेळी साकारली. यादरम्यान त्याने 17 चौकार आणि 2 षटकारही मारले. दुसऱ्या डावात केंटने 6 बाद 197 धावा केल्या. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी केंट संघ 353 धावांनी आघाडीवर आहे. (indian pacer arshdeep singh took ben foakes first wicket in county championship while playing for kent)
महत्वाच्या बातम्या-
सुट्टीच नाही! WTC गमावताच गांगुलीने भारतीय खेळाडूंना झाप झाप झापलं, म्हणाला, ‘धोनी-गंभीरसारखं 90-100…’
WTC Final जिंकताच IPLबद्दल मोठी गोष्ट बोलला स्टार्क; म्हणाला, ‘मला पश्चाताप नाही, 100हून अधिक वर्षे…’





