मुंबई। भारतीय वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीने आज इंस्टाग्रामला एक व्हिडीओ पोस्ट करून आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
त्याने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा मुंबईतील सीएसटी रेल्वेस्टेशन बाहेर आपले क्रिकेटची किटबॅग पाठीवर घेऊन गर्दीमध्ये ट्रेन पकडण्यासाठी जात आहे.
धवलने हा व्हिडीओ पोस्ट करताना लिहिले आहे की “ते दिवस मी कधीही विसरू शकत नाही. तो लहान मुलगा आपले किट बॅग घेऊन मैदानावर दिवसभर कष्ट केल्यानंतर गर्दीतून रेल्वे स्टेशनवर ट्रेन पकडण्यासाठी जात आहे. या दृश्याने मला माझे जुने दिवस आठवले.”
https://www.instagram.com/p/BbMYdXRnuUk/?taken-by=dhawal_kulkarni
धवल कुलकर्णी सध्या मुंबईकडून रणजी ट्रॉफीत खेळत आहे. उद्या मुंबई विरुद्ध बडोदा असा रणजी सामना होणार आहे. विशेष म्हणजे हा सामना मुंबईचा ५०० वा रणजी सामना आहे आणि ५०० सामने खेळणारा मुंबईचा पहिला संघ आहे. मुंबईने आत्तापर्यंत ४१ वेळा रणजी ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले आहे.